बिग बॉस मराठी २ : 'बिग बॉस'च्या घरात सुरू झालीय लग्नाची लगबग, जाणून घ्या कोण आहे हे जोडपं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 04:22 PM2019-06-15T16:22:10+5:302019-06-15T16:22:41+5:30

नवीन टास्‍क 'पाणी वापरा जपून'मध्‍ये प्रसिद्ध केव्‍हीआरपीच्‍या शो डाऊनसह अनेक आश्‍चर्यजनक ट्विस्‍ट्स पाहायला मिळाले.

Bigg Boss Marathi 2: wedding at Bigg Boss Home | बिग बॉस मराठी २ : 'बिग बॉस'च्या घरात सुरू झालीय लग्नाची लगबग, जाणून घ्या कोण आहे हे जोडपं

बिग बॉस मराठी २ : 'बिग बॉस'च्या घरात सुरू झालीय लग्नाची लगबग, जाणून घ्या कोण आहे हे जोडपं

googlenewsNext


नवीन टास्‍क 'पाणी वापरा जपून'मध्‍ये प्रसिद्ध केव्‍हीआरपीच्‍या शो डाऊनसह अनेक आश्‍चर्यजनक ट्विस्‍ट्स पाहायला मिळाले. पण वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये आपल्‍याला काही वेगळीच खिचडी शिजताना पाहायला मिळेल. स्‍पर्धक गोव्‍यामध्‍ये पराग व रुपालीच्‍या विवाहाच्‍या तयारीला लागले आहेत. 

सुरेखा पुणेकर, किशोरी शहाणे, वैशाली म्‍हाडे, रूपाली भोसले, शिवानी सुर्वे व नेहा शितोले हे गार्डनमध्‍ये बसले आहेत. ते रूपालीला परागसोबत विवाह करण्‍यासाठी मनवत आहेत. सुरेखा ताई रूपालीला चिडवत म्‍हणतात, ''मी चांगली तयारीत होते की, इथून गेल्‍यानंतर गोव्‍याला जायचं लग्‍नाला. माझी एक आवडती साडी मी आणलेली, पण घातली नाही इथे विचार करून की गोव्‍याला नेसेन तुझ्या लग्‍नासाठी!''


रूपाली विचारते, ''ताई माझ्याकडे बघ आणि त्‍याच्‍याकडे बघ, माझ्यात आणि त्‍याच्‍यात काही आहे का साम्‍य?''


सुरेखा या प्रश्‍नाची मस्‍करी करत म्‍हणतात, ''दिल गया गधे पे तो परी क्‍या चीज है! तुला टकला पण आवडू शकतो ना!'' यावर सर्वजण हसू लागतात. हे सर्व घडत असताना रूपाली सर्व गोष्‍टींना नकार देते आणि म्‍हणते की, तिला परागसारखा पुरूष कधीच आवडणार नाही.


पुढे वैशाली म्‍हणते, ''आम्‍हाला गोव्‍याला जायचं आहे, तू कर ग लग्‍न. काल बिचारा एवढं गाणं म्‍हणाला ' तेरे से मॅरेज करने को मैं गोवासे मुंबई आया' अशी कशी विसरली तू! आम्‍ही नवरीकडून आणि नव-याकडून पण आहोत'' याबाबत सुरेखा ताई म्‍हणतात, ''आपण फक्‍त नवरीकडून आहोत!''

Web Title: Bigg Boss Marathi 2: wedding at Bigg Boss Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.