Bigg Boss Marathi 3 : ‘मी आतमध्ये येऊन चोपीन एकएकाला...’, महेश मांजरेकर इतके का संतापले?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 11:21 AM2021-11-07T11:21:24+5:302021-11-07T11:21:43+5:30
Bigg Boss Marathi 3 Chavadi special: काल शनिवारी चावडी भरली आणि मांजरेकर पुन्हा संतापलेले दिसले. मीरा, जय, उत्कर्ष, तृप्ती देसाई, मीनल अगदी सगळ्यांनाच त्यांनी झाप झाप झापलं.
‘बिग बॉस मराठी 3’च्या (Bigg Boss Marathi 3 ) घरात सध्या स्पर्धकांचा गेम रंगतोय. सर्वजण अगदी जीवतोडून खेळताहेत. पण यादरम्यान काही चुका होणारचं आणि महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) शनिवार-रविवारी होणा-या चावडीवर शाळा घेणारचं. काल शनिवारीही चावडी (Bigg Boss Marathi 3 Chavadi ) भरली आणि यावेळी मांजरेकर पुन्हा संतापलेले दिसले. मीरा, जय, उत्कर्ष, तृप्ती देसाई, मीनल अगदी सगळ्यांनाच त्यांनी झाप झाप झापलं. अगदी घरात येऊन चोपीन एकएकाला, अशी तंबीच त्यांनी दिली.
आता असं काय झालं तर सदस्यांनी म्हणे मांजरेकरांच्या बोलण्याचं भांडवलं केलं आणि ते संतापले. ‘मी इथे शनिवारी जे बोलतो ना, त्याचं भांडवल करायचं नाही हां तिकडे. मी बोलतो कारण मला बोलायचा हक्क आहे. तुम्हाला एकमेकांना सांगायचा काहीही हक्क नाही. सर बरोबर बोलतात की चूकीचं बोलताहेत, असं एकमेकांना सांगून त्याचा वापर करू नका. मी आतमध्ये येऊन चोपीन एकएकाला, असं महेश मांजरेकर म्हणाले. त्यांचा तो रूद्र अवतार पाहून घरातील सदस्यांच्या चेह-यावरचा रंग उडाला नसेल तर नवल.
विकासलाही खडसावलं...
विकास, नका ना प्रत्येकवेळी फाडू तोडू रे... छान सुरू होता तो टास्क रे. कशाला गरज होती. गायत्री नको म्हणत असताना तू तोडलंस. मग काय मीरा बाईंच्या हाती कोलितचं दिलं तुम्ही.. गायत्री त्यांना नको नको म्हणत होती. मला या आठवड्यातला तिचा स्टँड आवडला असं मांजरेकर म्हणाले. सोनालीलाही त्यांनी चिमटा काढला. सोनाली आता तू काय बोलते ते कळू दे गं. तुझा मुद्दा काहीच कळत नाही. तू फक्त आपली रटारटारटा नुसती बोलत असते, असं ते म्हणाले.