Bigg Boss Marathi 3, Episodes, 27 Oct : जयने केली अतिशयोक्तीची मर्यादा पार; विकासाला फाडायला लावले कपडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 05:00 PM2021-10-27T17:00:00+5:302021-10-27T17:00:00+5:30
Bigg boss marathi 3: संयमाची ऐशी तैशी या टास्कमध्ये एकीकडे जय- मीरा हे दोघं मिनलला टक्कल करायला लावण्याचा डाव आखत आहेत. तर दुसरीकडे जय विकासला कपडे फाडायला लावणार आहे.
'बिग बॉस'च्या (bigg boss marathi 3) घरात सध्या 'संयमाची ऐशी तैशी' हे कार्य पार पडत आहे. या कार्यामध्ये नरक टीममध्ये असलेले सदस्य स्वर्ग टीममधल्या सदस्यांना प्रचंड मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत या टास्कमध्ये अनेकांची पस्परांसोबत भांडणंदेखील झाली आहेत. इतकंच नाही तर विकास (vikas patil) आणि विशालच्या (vishal nikam) मैत्रीत फूट पडल्याचं दिसून येत आहे. यामध्येच जयने (jay dudhane) आता अतिशयोक्तीची मर्यादा पार केली आहे. या टास्कमध्ये तो विकासला चक्क कपडे फाडायला लावणार आहे.
संयमाची ऐशी तैशी या टास्कमध्ये एकीकडे जय- मीरा हे दोघं मिनलला टक्कल करायला लावण्याचा डाव आखत आहेत. तर दुसरीकडे जय विकासला कपडे फाडायला लावणार आहे. कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जय जबरदस्तीने विकासला कपडे फाडून पाण्यात टाकायला लावत आहे.
Biggg Boss Marathi: मिनलला करावं लागणार टक्कल?; जयची खेळी पडणार भारी
दरम्यान, 'तू सगळ्यात फेक संचालक आहेस', असंही जय विकासला बोलताना दिसत आहे. त्यामुळे आज या टास्कमध्ये अजून काय काय पाहायला मिळणार हे आजचा भाग पाहिल्यावर प्रेक्षकांना कळणार आहे.