Bigg Boss Marathi 3 Upadate: गायत्री दातारने घेतला मोठा निर्णय,मीरा जगतापला सांगितली मनातली गोष्ट !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 11:51 AM2021-10-28T11:51:50+5:302021-10-28T11:54:20+5:30

Bigg Boss Marathi 3:जय, उत्कर्ष, मीरा आणि गायत्री यांचा ग्रुप अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे.कोणतीही गोष्ट असो ते एकेमकांची साथ द्यायला पुढे मागे बघत नाहीत. कुठलंही कार्य असो, वा चर्चा असो हे चौघही एकत्रच चर्चा करून कायम निर्णय घेताना दिसतात.

Bigg Boss Marathi 3 update, Gayatri Daata tooks this big decision, has shared with Meera Jagtap | Bigg Boss Marathi 3 Upadate: गायत्री दातारने घेतला मोठा निर्णय,मीरा जगतापला सांगितली मनातली गोष्ट !

Bigg Boss Marathi 3 Upadate: गायत्री दातारने घेतला मोठा निर्णय,मीरा जगतापला सांगितली मनातली गोष्ट !

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ग्रुपमधील सदस्यांची नाती बदलताना दिसतं आहेत. एकेमेकांवर तितकासा विश्वास राहिलेला दिसून येत नाहीये वा कुठतरी थोडासा दुरावा आला आहे असे जाणवत आहे. जय, उत्कर्ष, मीरा आणि गायत्री यांचा ग्रुप अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे.कोणतीही गोष्ट असो ते एकेमकांची साथ द्यायला पुढे मागे बघत नाहीत. कुठलंही कार्य असो, वा चर्चा असो हे चौघही एकत्रच चर्चा करून कायम निर्णय घेताना दिसतात. पण आता 
याच्यामध्येच दुरावा येत असल्याचे पाहायला मिळत आहे. घरात असे काही घडत आहे ,ज्यामुळे गायत्री जरा चिंतेत आहे आणि ती हीच गोष्ट आज मीराला बोलून दाखवणार आहे. मीराचं बोलणं गायत्रीला पटलं असून नक्की असं काय झालं की गायत्रीला असं वाटलं ? ते आजच्या भागामध्ये कळेलच.

 गायत्री मीराला म्हणाली, मी एक ठरवलं आहे मी काही कोणाशी बोलायला जाणार नाहीये. फक्त मी बघणार आहे यावेळेस आणि मग त्याप्रमाणे मी पुढे जर राहिले घरता या शनिवारनंतर तर मग मी त्याचप्रमाणे खेळेन. मीरा म्हणाली ऑफकोर्स तू रहाणार आहेस. गायत्री म्हणाली काहीही होऊ शकतं. मी उत्कर्षला पण हेच म्हणत होते, की जेव्हा आपण ग्रुप म्हणतो तेव्हा चल माझ्यासाठी एकच माणूस खेळू शकतो तर मग ते तू खेळशील किंवा उत्कर्ष खेळेल मला कोणीही चालेल तो प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा कॉम्पिटीटर असतात चार लोकं. तेव्हा त्याला आपल्याकडुन पाठिंबा नाही मिळाला पाहिजे ही पण आपलीच ड्युटी आहे ना ? माझा हा मुद्दा आहे. 

मीरा म्हणाली, म्हणून मी तुला म्हणाले काही गोष्ट या आपल्यातच राहू दे. कारण काय होणार उद्या काही झालं ना हे दोघं एकमेकांना पाठिंबा देणार हे स्पष्ट आहे एकदम जे दिसतंच आहे. त्यामुळे याच्यापुढे आपण हे बोलायचे नाही. आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचे आहे.प्रत्येकजण इथे स्वार्थी आहे, आपण बोलून उगाच वाईट नाही व्हायचं हेच मी इथे शिकले आहे. त्यामुळे मी बोलणं बंद केलं आहे.”

Web Title: Bigg Boss Marathi 3 update, Gayatri Daata tooks this big decision, has shared with Meera Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.