Bigg Boss Marathi 4, Day 17 : तेजस्विनीला खटकतंय अपूर्वाचं वागणं, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 03:16 PM2022-10-19T15:16:12+5:302022-10-19T15:16:50+5:30

Bigg Boss Marathi 4 : आज घरात तेजस्विनी, अमृता देशमुख, योगेश आणि अमृता धोंगडे अपूर्वा बद्दल चर्चा करताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi 4, Day 17 : Tejaswini is disturbed by Apoorva's behavior, said... | Bigg Boss Marathi 4, Day 17 : तेजस्विनीला खटकतंय अपूर्वाचं वागणं, म्हणाली...

Bigg Boss Marathi 4, Day 17 : तेजस्विनीला खटकतंय अपूर्वाचं वागणं, म्हणाली...

googlenewsNext

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi Season 4) पहिल्या दिवसापासून चर्चेत आला आहे. आता या सीझनमधील पहिले एलिमिनेशन झाले असल्यामुळे स्पर्धकांमध्ये चुरस आणि चिंता दोन्हीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे घरात भांडणांसोबत धमालमस्तीदेखील पाहायला मिळत असते. दरम्यान आज घरात तेजस्विनी, अमृता देशमुख, योगेश आणि अमृता धोंगडे अपूर्वा बद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. 

बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्ये बऱ्याचदा चर्चा होताना दिसते. अशीच चर्चा आजदेखील होताना दिसणार आहे. यात तेजस्विनी, अमृता देशमुख, योगेश आणि अमृता धोंगडे अपूर्वा बद्दल चर्चा करताना दिसतील. ज्यामध्ये तेजस्विनीला अपूर्वाचं वागणं खटकतं आहे आणि तिचे म्हणणे आहे अपूर्वा नीट खेळत नाही. 


तेजस्विनी सांगताना दिसणार आहे, "अपूर्वाचा काय सीन आहे कळतं नाही मला. काय होतं हे लोक घरात जे वागतात त्याचं रिफ्लेक्शन टास्कमध्ये येतं आणि मग टास्कमध्ये माझ्या डोक्यात ते सगळं असतं की, तुम्ही सगळीकडे इतकं अयोग्य वागता आणि मग टास्कमध्ये योग्य बोलू नका. अमृता धोंगडेचे म्हणणे आहे, तुमचं जर वैर असेल एखाद्याशी कि तुम्हांला एकाला कॅप्टन बनूच द्यायचे नाहीये तर तुम्ही तशी स्ट्रॅटेजि प्लॅन करता. तेजस्विनी म्हणाली, मेघताई पण म्हणत होत्या, की भांडी लावायला आली असं कधी केले नाही ना किती पण चुका केल्या तरी. अमृता देशमुखचं म्हणणं आहे, मेघा ताईचं लगेच असतं इथे काही बिनसलं की ती लगेच किचनमध्ये सांगते. बघूया पुढे काय होईल ते घरात. बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. 

Web Title: Bigg Boss Marathi 4, Day 17 : Tejaswini is disturbed by Apoorva's behavior, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.