'बिग बॉस'च्या घरात सूरजला कचरा काढताना पाहून अंकिताला वाटलं वाईट, म्हणाली, "त्याला गेम नाही कळला पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 09:41 AM2024-08-09T09:41:35+5:302024-08-09T09:44:18+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : घरातील कामं करण्यापासून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सूरज कसलीच कसर सोडताना दिसत नाहीये. आता सूरजचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

bigg boss marathi 5 ankita walawalkar gets emotional after see suraj chavan doing house duty | 'बिग बॉस'च्या घरात सूरजला कचरा काढताना पाहून अंकिताला वाटलं वाईट, म्हणाली, "त्याला गेम नाही कळला पण..."

'बिग बॉस'च्या घरात सूरजला कचरा काढताना पाहून अंकिताला वाटलं वाईट, म्हणाली, "त्याला गेम नाही कळला पण..."

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यंदाच्या सीझनमध्ये रीलस्टार सूरज चव्हाणही सहभागी झाला आहे. सूरज बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. घरातील कामं करण्यापासून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सूरज कसलीच कसर सोडताना दिसत नाहीये. आता सूरजचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. 

या व्हिडिओत सूरज घरातील कचरा काढताना दिसत आहे. गार्डन एरियात सूरज झाडू मारत स्वच्छता करताना दिसत आहे. सूरजला असं काम करताना पाहून कॅप्टन अंकिताला वाईट वाटत आहे. गार्डन एरियात अंकिता आणि पॅडी बसल्याचं दिसत आहे. सूरजला कचरा काढताना पाहून अंकिता म्हणते, "याला असं बघून मला खूप वाईट वाटतंय". त्यावर पॅडी तिला म्हणतो, "एरव्ही पण बाहेर हा अशीच कामं करत असेल. काल मला म्हणाला की दादा मला फार वाईट वाटतंय मी वर झोपतोय आणि तुम्ही खाली झोपताय". त्यानंतर अंकिता "भले त्याला गेम नाही कळला. पण, त्याला माणसं कळली", असं पॅडीला म्हणते. 


सूरजचा घरातील हा व्हिडिओ पाहून चाहतेही भावुक झाले आहेत. दरम्यान, पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेली आणि बिग बॉसचं घर डोक्यावर घेणारी निक्की या आठवड्यात नॉमिनेट झाली आहे. दुसऱ्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्कनंतर बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कमध्ये निक्कीबरोबर योगिता चव्हाण, पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, निखिल दामले, घनश्याम दरवडे हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण
 

Web Title: bigg boss marathi 5 ankita walawalkar gets emotional after see suraj chavan doing house duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.