दोन महिन्यांनी कोकणातील घरी परतली अंकिता वालावलकर'; लाडक्या लेकीला समोर पाहताच आई म्हणते-"आली लक्ष्मी ..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 12:07 PM2024-10-24T12:07:15+5:302024-10-24T12:21:42+5:30

'बिग बॉस मराठी'(Bigg Boss marathi) च्या पाचव्या पर्वात कोकणकन्या अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सहभागी झाली होती.

bigg boss marathi 5 ankita walawalkar returned in hometown konkan after two months video viral  | दोन महिन्यांनी कोकणातील घरी परतली अंकिता वालावलकर'; लाडक्या लेकीला समोर पाहताच आई म्हणते-"आली लक्ष्मी ..."

दोन महिन्यांनी कोकणातील घरी परतली अंकिता वालावलकर'; लाडक्या लेकीला समोर पाहताच आई म्हणते-"आली लक्ष्मी ..."

Ankita Walawalkar : 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss marathi) च्या पाचव्या पर्वात कोकणकन्या अंकिता वालावकर (Ankita Walawalkar) सहभागी झाली होती. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे अंकिताने प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय तिच्या दमदार खेळीमुळे कोकण हार्टेड गर्लने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होत. सुरुवातीच्या काळात बिग बॉसच्या घरात शांतपणे वावरणारी अंकिता कालांतराने इतर सदस्यांसोबत पूर्णपणे मिसळली. अखेर अंकिता या पर्वाच्या टॉप-५ पर्यंत पोहचली. पण, फिनालेमध्ये अंकिता पाचव्या क्रमांकावर एलिमिनेट झाली आणि त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं.

'बिग बॉस मराठी'नंतर अंकिता आता तिच्या राहत्या घरी कोकणात पोहचली. याचा व्हिडीओ अंकिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. जवळपास दोन महिन्यानंतर अंकिता आणि तिच्या आईची भेट झाली. या मायलेकीच्या भेटीच्या क्षण पाहून नेटकरी देखील भावुक झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये अंकिता घरी पोहचल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शिवाय लाडक्या लेकीला समोर बघताच अंकिताची आई तिला घट्ट मारताना दिसते आणि म्हणते 'आली लक्ष्मी आली!'

इतक्या दिवसांनी कोकणात पोहल्यानंतर पहिल्यांदा अंकिता तिने सुरू केलेल्या दुकानात जाते. 'सिंधुद्योग' नावाने ती व्यवसाय चालवते. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेली अंकिता पेशाने व्यावसायिका सुद्धा आहे. त्याच व्हिडीओ देखील तिने शेअर केलाय. 

Web Title: bigg boss marathi 5 ankita walawalkar returned in hometown konkan after two months video viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.