"अभिजीत जिंकला असता तर आनंद झाला नसता, कारण...", अंकिता वालावलकरने स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 03:33 PM2024-10-08T15:33:12+5:302024-10-08T15:33:32+5:30
सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत हे बिग बॉस मराठीचे टॉप २ होते. पण, अभिजीतने ट्रॉफी जिंकली असती तर अजिबात आनंद झाला नसता, असं वक्तव्य अंकिताने घराबाहेर येताच केलं आहे.
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. सूरज चव्हाणने यंदाच्या बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. बिग बॉस मराठी ५ ची ट्रॉफी जिंकून सूरजने केवळ त्याचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण केलं. सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत हे बिग बॉस मराठीचे टॉप २ होते. पण, अभिजीतने ट्रॉफी जिंकली असती तर अजिबात आनंद झाला नसता, असं वक्तव्य अंकिताने घराबाहेर येताच केलं आहे.
अंकिताने घराबाहेर येताच लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत सावंतबाबत वक्तव्य केलं आहे . या मुलाखतीत ती म्हणाली, "सूरजला विजेता घोषित केलं तेव्हा मी सोफ्यावर चढून पॅडीदादांना मिठी मारुन रडले. आपण सूरजला जिंकवलं. टीम बी मधला आपला विनर झालाय. आता पुढची जबाबदारी त्याची आहे. पण, आपण ते केलं". "अभिजीत जिंकला असता तर असाच आनंद झाला असता का?" असा प्रश्नही अंकिताला विचारला गेला. त्यावर ती म्हणाली, "अभिजीत आणि सूरज तिथे होते. पण, त्या आठवड्यात जे झालं ते पाहता अजिबातच नाही. अभिजीतसाठी तो आनंद झाला नसता. काही आठवड्यांपूर्वी आम्ही अभिजीतसाठी हे बोलतच होतो. त्यामुळे तो विनर झाला असता तर आनंदच होता. पण, ज्या पद्धतीने सूरजसाठी भावनिक झालो. त्यापद्धतीने झालं नसतं".
दरम्यान, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी यांनी टॉप ३ मध्ये स्थान मिळवलं होतं. सूरजने सर्वाधिक वोट मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं. अभिजीत फर्स्ट रनर अप ठरला तर निक्की तांबोळीला तिसरं स्थान मिळालं. धनंजय पोवार चौथ्या तर अंकिता वालावलकर पाचव्या स्थानावर राहिली. ९ लाख रुपयांची बॅग घेऊन जान्हवी किल्लेकरने सहाव्या क्रमांकावर राहणं पसंत केलं.
बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावलेल्या सूरजला 'बिग बॉस मराठी ५'चा लोगो असलेला डोळा आणि पाठीमागे यंदाची थीम असलेलं चक्रव्यूह अशी यंदाच्या पर्वाची ट्रॉफी मिळाली आहे. या ट्रॉफीबरोबरच विजेत्याला १४.६० लाख रुपये मिळाले आहेत. तर इलेक्ट्रिक स्कूटरही सूरजला मिळाली आहे.