Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस'च्या घरात कोकणातील सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरची होणार एन्ट्री, कोण आहे ती ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 12:50 PM2024-07-15T12:50:30+5:302024-07-15T12:52:36+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

Bigg Boss Marathi 5 Contestant Social Media Influencer Kokan Hearted Girl Aka Ankita Walawalkar set to enter the Bigg Boss Marathi 5 house | Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस'च्या घरात कोकणातील सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरची होणार एन्ट्री, कोण आहे ती ?

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस'च्या घरात कोकणातील सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरची होणार एन्ट्री, कोण आहे ती ?

Bigg Boss Marathi 5 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  यंदाच्या सीझनमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे महेश मांजरेकरांच्या जागी अभिनेता रितेश देशमुख शो होस्ट करणार आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन येत्या २८ जुलैपासून सुरू होणार आहे. या नव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.   कलर्स मराठी वाहिनी किंवा बिग बॉस मराठीच्या मेकर्सकडून अधिकृत स्पर्धकांची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. पण, सध्या एक लोकप्रिय नाव सध्या सोशल मीडियावर मात्र विशेष चर्चेत आले आहे.

 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात एक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाबाबत अपडेट देणाऱ्या एका फॅनपेजवरुन ही माहिती शेअर करण्यात आली आहे. ही लोकप्रिय व्यक्ती म्हणजे 'कोकण हार्टेड गर्ल' या नावाने लोकप्रिय असणारी कोकण कन्या अंकिता वालावलकर. अंकिता ही बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. पण, याबाबत अद्याप तिनं, कलर्स मराठी वाहिनी किंवा बिग बॉस मराठीनं अधिकृत सांगितलेलं नाही.

अंकिता वालावलकर नेहमी चर्चेत असते. तिचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. अंकिता वालावलकरचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरील तिच्या प्रत्येक व्हिडीओचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.  अंकिता वालावलकर कोकणातील बोलीभाषा, तिथलं घर, बाग, निसर्गसौंदर्याचा वापर करून अनेक व्हिडीओ बनवत आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. पण, अनेकदा ती ट्रोलही झाली आहे.  यासोबतच अभिनेता ओंकार भोजनेबरोबर असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली होती. ओंकारबरोबरचा तिचा फोटो व्हायरल झाल्यामुळे दोघांमध्ये काहीतरी आहे, अशा चर्चांना उधाण आलं होतं. 

Web Title: Bigg Boss Marathi 5 Contestant Social Media Influencer Kokan Hearted Girl Aka Ankita Walawalkar set to enter the Bigg Boss Marathi 5 house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.