"खूप चांगला खेळलास", अंकिताच्या आईने केलं सूरजचं कौतुक; व्हिडीओ कॉलद्वारे साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 03:28 PM2024-10-26T15:28:17+5:302024-10-26T15:36:09+5:30
'बिग बॉस मराठी'च्या (bigg boss marathi 5) माध्यमातून बारामतीचा पठ्ठ्या सूरज चव्हाण प्रसिद्धीझोतात आला.
Ankita Walawalkar : 'बिग बॉस मराठी'च्या (bigg boss marathi 5) माध्यमातून बारामतीचा पठ्ठ्या सूरज चव्हाण प्रसिद्धीझोतात आला. या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं प्रेम मिळतंय. अशातच 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताची आई सूरज चव्हाणची मोठ्या आपुलकीने विचारपूस करताना दिसत आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिता वालावलकर २ महिन्यानंतर तिच्या मुळगावी कोकणात पोहोचली आहे. तिथे गेल्यानंतर अंकिताने सूरजला व्हिडीओ कॉल केला. सूरज चव्हाणला ‘बिग बॉस’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून सर्वस्पर्धकांनी त्याला सांभाळून घेतलं होतं. शिक्षण कमी असल्याने सुरुवातीला सूरजला टास्क समजून घेण्यात अडचणी निर्माण व्हायच्या. परंतु, पंढरीनाथ कांबळे आणि अंकिताने त्याच्या पाठीशी कायम उभे राहिले. 'बिग बॉस'च्या घरात त्यांनी सूरजला खंबीरपणे साथ दिली. नुकताच काही दिवसांपूर्वी 'गुलिगत किंग' सूरजच्या वाढदिवसानिमित्त अंकिताने त्याला फोन करून संवाद साधला होता.
दरम्यान, नुकताच अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताच्या आईने सूरजसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या, "बिग बॉसमध्ये तू उत्तम पद्धतीने खेळत होतास. तुला तिकडे पाहून खूप बरं वाटलं. त्यावर उत्तर देताना सूरज म्हणतो, मी माझ्या बहिणीची उत्तमरित्या काळजी घेतली".
पुढे व्हिडीओमध्ये अंकिता वालावलकरच्या आई म्हणतात, "तू बरा आहेस आहेस ना अशारितीने त्याची अगदी आपलेपणाने चौकशी करताना दिसत आहेत".
नुकतीच सूरजच्या नव्या घराच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली आहे. यानिमित्ताने अंकिताने त्याला फोनवरून संपर्क केला. काही वैयक्तिक कारणामुळे तिला बारामतीला जाता आलं नाही. पण, या व्हिडीओच्या माध्यमातून तिने सूरजच्या चाहत्यांनी आनंदाची बातमी दिली आहे.