जान्हवीमुळे चाहत्याचं झालं मोठं नुकसान, म्हणाला, "तुमचा आवाज ऐकून माझ्या बायकोने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 05:07 PM2024-09-08T17:07:09+5:302024-09-08T17:07:30+5:30

Bigg Boss Marathi 5: चाहत्याने कमेंट करत जान्हवीमुळे त्याच तब्बल ३ हजारांचं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात जान्हवी आणि घनश्याममध्ये भांडण झालं होतं. यामुळे त्यांचं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

bigg boss marathi 5 fan demand janhavi killekar for 3 thousands know the reason | जान्हवीमुळे चाहत्याचं झालं मोठं नुकसान, म्हणाला, "तुमचा आवाज ऐकून माझ्या बायकोने..."

जान्हवीमुळे चाहत्याचं झालं मोठं नुकसान, म्हणाला, "तुमचा आवाज ऐकून माझ्या बायकोने..."

Bigg Boss Marathi 5: जान्हवी किल्लेकर ही बिग बॉस मराठीच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. पहिल्या दिवसापासूनच चर्चेत असलेल्या जान्हवीला घरात अरेरावी आणि सदस्यांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे शिक्षेला सामोरं जावं लागलं होतं. पॅडीचा अपमान केल्यामुळे जान्हवीला रितेशने एक आठवडा तुरुंगात राहण्याची शिक्षा दिली होती. याबरोबरच जान्हवीला भाऊच्या धक्क्यावरही रितेशने स्थान दिलं नव्हतं. मात्र यंदाच्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर रितेशने जान्हवीला बसण्यास सांगितलं.

रितेशने घरातील सदस्यांबरोबर एक गेम खेळला. यामध्ये महाराष्ट्रातील जनतेला घरातील सदस्यांबद्दल काय वाटतं, याची झलक त्याने सदस्यांना दाखवली. यावेळी जान्हवीसाठी मात्र एका चाहत्याचा खास संदेश रितेशने पोहोचवला. या चाहत्याने कमेंट करत जान्हवीमुळे त्याच तब्बल ३ हजारांचं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात जान्हवी आणि घनश्याममध्ये भांडण झालं होतं. यामुळे त्यांचं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


चाहत्याने काय म्हटलं? 

जान्हवी बाहेर आल्या आल्या मला तुमचा नंबर द्या...कारण तुमच्यामुळे माझं ३५६८ रुपयाचं नुकसान झालं आहे… मी नवीन काचेचा डिनर सेट घेतला होता.. तो बायको हातात घेऊन उभी होती...आणि त्याच वेळी तुम्ही घनःश्याम वर ओरडलात..आणि दचकून तिच्या हातातून तो पडला, फुटला...या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात. तेव्हा प्लीज प्लीज प्लीज...माझे ३५६८ रुपये देऊन टाका.

यानंतर रितेशसह घरातील सगळे सदस्य हसत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर रितेश जान्हवीला विचारतो की तयारी केलीय की नाही तुम्ही? त्यावर जान्हवी त्याला हो सर नक्की, असं उत्तर देते. दरम्यान, बिग बॉसच्या घरातील घनश्याम दरवडेचा प्रवास शनिवारी संपला. आता रविवारी बिग बॉस मराठीच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. 

Web Title: bigg boss marathi 5 fan demand janhavi killekar for 3 thousands know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.