Bigg Boss Marathi : टास्कमध्ये निक्कीची मनमानी! अरबाज भडकला अन्...; 'बिग बॉस'च्या घरात पुन्हा राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 09:35 AM2024-09-19T09:35:11+5:302024-09-19T09:42:34+5:30

बिग बॉसच्या घरातील या कॅप्टन्सी टास्कमध्ये पुन्हा निक्की आणि अरबाजमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

bigg boss marathi 5 nikki and arbaaz fight during captaincy task video | Bigg Boss Marathi : टास्कमध्ये निक्कीची मनमानी! अरबाज भडकला अन्...; 'बिग बॉस'च्या घरात पुन्हा राडा

Bigg Boss Marathi : टास्कमध्ये निक्कीची मनमानी! अरबाज भडकला अन्...; 'बिग बॉस'च्या घरात पुन्हा राडा

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये घरातील सदस्यांमध्ये दोन टीम पाडण्यात आल्या आहेत. घरात या आठवड्यात जंगलराज असल्याने अंड्याचा फंडा टास्क देण्यात आला आहे. या टास्कमध्ये दुसऱ्या स्पर्धकाच्या घरट्यात अंड ठेवून त्या सदस्याला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाद करायचं आहे. 

बिग बॉसच्या घरातील या कॅप्टन्सी टास्कमध्ये पुन्हा निक्की आणि अरबाजमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. या टास्कसाठी टीम A मध्ये निक्की, अरबाज, सूरज, धनंजय आणि वर्षा तर टीम B मध्ये अभिजीत, अंकिता, जान्हवी, पॅडी आणि संग्राम हे सदस्य आहेत. या टास्कदरम्यानचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत टीम A टास्कसाठी प्लॅनिंग करताना दिसत आहेत. अरबाज म्हणतो, "पहिल्या फेरीत संग्राम आणि अभिजीतला काढूया". पण, टास्क सुरू झाल्यानंतर मात्र निक्की अंकिता आणि पॅडीच्या घरट्यात अंड ठेवून त्यांना कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर काढते. 


यावरुन मात्र टीम A मध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. निक्कीने पुन्हा तिची मनमानी केल्याने टीम A मधील सदस्य चिडल्याचं दिसत आहे. तर अरबाजला राग अनावर झाला आहे. "मी तिथे विसरली आणि मला पॅडी दादांना काढावंसं वाटलं", असं निक्कीने म्हटल्यावर अरबाज चिडल्याचं पाहायला मिळत आहे. "इतक्या लवकर कोण विसरतं?" असं म्हणत अरबाज बेडरुममध्ये आदळाआपट करताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा निक्की आणि अरबाजमध्ये बिनसणार असल्याची चिन्ह आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्यात वैभव चव्हाणचा घरातील प्रवास संपला. तर निक्कीच्या कानाखाली मारल्याने आर्याला घरातून एक्झिट घ्यावी लागली. या आठवड्यात निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे सदस्य थेट नॉमिनेट झाले आहेत. आता यातील कोणाचा प्रवास संपतो, हे पाहावं लागेल. 

Web Title: bigg boss marathi 5 nikki and arbaaz fight during captaincy task video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.