Bigg Boss Marathi 5 : "दम असेल तर तोंडावर बोल", निक्कीने संग्रामला सगळ्यांसमोरच दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 09:12 AM2024-09-16T09:12:02+5:302024-09-16T09:12:37+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये संग्राम आणि निक्कीमध्ये तू तू मै मै झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 5 nikki tamboli and sangram choughule cat fight video viral | Bigg Boss Marathi 5 : "दम असेल तर तोंडावर बोल", निक्कीने संग्रामला सगळ्यांसमोरच दिली धमकी

Bigg Boss Marathi 5 : "दम असेल तर तोंडावर बोल", निक्कीने संग्रामला सगळ्यांसमोरच दिली धमकी

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा मागचा आठवडा अनेक कारणांमुळे चर्चेत होता. घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्यापासून सदस्यांमधील समीकरणं बदललेली पाहायला मिळाली. बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने घरात एन्ट्री घेताच निक्की आणि अरबाजशी पंगा घेतला होता. संग्राम, निक्की आणि अरबाजमध्ये ३६चा आकडा असल्याचं पाहायला मिळत आहे. छोट्या छोट्या कारणांवरुन त्यांच्या वादही होताना दिसत आहेत. 

आतादेखील बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये संग्राम आणि निक्कीमध्ये तू तू मै मै झाल्याचं पाहायला मिळत आहे. गार्डन एरियामध्ये एका बाजूला निक्की, अरबाज तर दुसऱ्या बाजूला संग्राम, सूरज, अभिजीत आणि अंकिता बसल्याचं व्हिडिओत दिसत आहे. संग्राम निक्की आणि अरबाजला बोलतो, "जवळच्या माणसांना खड्ड्यात घालायचं".


 

त्यावर निक्की त्याला चिडून बोलते की "फुसक्या बारसारखं घरात बोलायचं नाही. दम असेल तर तोंडावर बोलून दाखव". त्यानंतर संग्राम तिला म्हणतो, "कुठल्या गोष्टी कशा घ्यायच्या ते तुम्ही ठरवताय". "स्वत:चं डोकं वापरा आणि नीट बोला. ना तळ्यात ना मळ्यात...तुमची तर अशी परिस्थिती आहे", असं निक्की रागाने बोलते. त्यानंतर संग्राम म्हणतो, "तुमच्यातील एकाला तुम्हीच घराबाहेर काढणार आहे". 

दरम्यान, गेल्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर सदस्यांना रितेशकडून ताकीद मिळाली आहे. आर्याने टास्कमध्ये निक्कीच्या कानाखाली मारल्याने तिला घराबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. तर गेल्या आठवड्यात वैभव चव्हाणने घराचा निरोप घेतला. 

Web Title: Bigg Boss Marathi 5 nikki tamboli and sangram choughule cat fight video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.