Bigg Boss Marathi 5: "नाव मोठं लक्षण खोटं "; निक्कीने अभिजीतवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 05:26 PM2024-09-09T17:26:04+5:302024-09-09T17:26:57+5:30

Bigg Boss Marathi Season 5: गणपती स्पेशल भाऊच्या धक्क्यावर कलर्स मराठी वाहिनीवरील 'इंद्रायणी' या मालिकेतील अनिता दाते आणि संदीप पाठक यांनी हजेरी लावली होती.

Bigg Boss Marathi 5: Nikki Tamboli targets Abhijeet Sawant | Bigg Boss Marathi 5: "नाव मोठं लक्षण खोटं "; निक्कीने अभिजीतवर साधला निशाणा

Bigg Boss Marathi 5: "नाव मोठं लक्षण खोटं "; निक्कीने अभिजीतवर साधला निशाणा

Bigg Boss Marathi Season 5 : गणपती स्पेशल भाऊच्या धक्क्यावर कलर्स मराठी वाहिनीवरील 'इंद्रायणी' या मालिकेतील अनिता दाते (Anita Date) आणि संदीप पाठक (Sandeep Pathak) यांनी हजेरी लावली होती. यावेळचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हे दोघे 'बिग बॉस'च्या घरात सज्ज झाले होते. संदीप पाठक आणि अनिता दाते यांनी घरातल्या  सर्व सदस्यांबरोबर गप्पा मारत त्याच्यासोबत गेम देखील खेळला. 

आजच्या 'अनसीन अनदेखा'मध्ये, निक्कीला अनिता आणि संदीप यांनी 'नावं मोठ आणि लक्षण खोटं' हा वाक्यप्रचार तुला घरातील सदस्यांपैकी कोणाला देऊ वाटते त्याला दे असे सांगितलं. तेव्हा निक्की म्हणाली की ," हो घरात एकच व्यक्ती आहे.  'नावं मोठं आणि लक्षण खोटं' हे वाक्य फक्त आणि फक्त अभिजीत सावंतसाठी आहे. माझ्याकडे यावर कारण देखील आहे. अभिजीतचे नाव मोठे आहे यामध्ये काही संशय नाही. मात्र त्याचे लक्षण खोटे आहे. तो खूप पलटी मारतो. या घरात माझे मुद्दे ऑन पॉईंट असतात पण त्यामध्ये तो असा अडकतो. त्यामुळे त्याला  समजत नाही की , निक्की असे  बोलली तर मी तिला काय बोलू. म्हणून तो मला  गुंतून टाकायचा प्रयत्न करतो पण मी गुंतत नाही." 

यावर अभिजीत म्हणाला,"निक्की मागच्या आठवड्यात जेव्हा तू माझ्या बोलण्यात गुंतली तेव्हा तुला प्रशंसा मिळाली हे लक्ष्यात ठेव". पुढे निक्की म्हणाली,"मी तुला गुंतवलं होतं. त्यामुळे  तू दिसलास पण यावेळी तसं नाही झाले". आजच्या  अनसीन अनदेखामध्ये तुम्हाला निक्की आणि अभिजीत यांच्यातील हा गेम पाहायला मिळेल. 

Web Title: Bigg Boss Marathi 5: Nikki Tamboli targets Abhijeet Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.