'बिग बॉस'च्या घरात रंगणार नॉमिनेशन टास्क, अंकिता-जान्हवी भिडणार, कोण सेफ आणि कोण होणार नॉमिनेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:39 PM2024-09-10T12:39:10+5:302024-09-10T12:40:08+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या आठवड्यातील नॉमिनेशनचं कार्य रंगणार आहे. या आठवड्यात घरातील कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणत्या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असणार हे नॉमिनेशन टास्कमध्ये पाहायला मिळणार आहे.

bigg boss marathi 5 nomination task ankita walawalkar and janvhi killekar fight for immunity video | 'बिग बॉस'च्या घरात रंगणार नॉमिनेशन टास्क, अंकिता-जान्हवी भिडणार, कोण सेफ आणि कोण होणार नॉमिनेट?

'बिग बॉस'च्या घरात रंगणार नॉमिनेशन टास्क, अंकिता-जान्हवी भिडणार, कोण सेफ आणि कोण होणार नॉमिनेट?

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या आठवड्यातील नॉमिनेशनचं कार्य रंगणार आहे. गेल्या आठवड्यात छोटा पुढारी घनश्याम दरवडेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. आता या आठवड्यात घरातील कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणत्या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असणार हे नॉमिनेशन टास्कमध्ये पाहायला मिळणार आहे. 

यंदा घरातील सदस्यांना इम्युनिटी कार्य देण्यात आलं आहे. या कार्यात जादुच्या दिव्यात इम्युनिटी बंदिस्त असणार आहे. प्रत्येक सदस्याच्या गळ्यात घरातील एका सदस्याचा फोटो अडकविण्यात आला आहे. या कार्यात सदस्यांना स्वत:ला नॉमिनेट होण्यापासून वाचवायचं आहे. या टास्कदरम्यानचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये टास्कदरम्यान अंकिता आणि जान्हवीमध्ये वाद होत असल्याचं दिसत आहे. 


अंकिताच्या गळ्यात जान्हवीचा फोटो आहे. तर जान्हवीच्या गळ्यात निक्कीचा फोटो अडकविण्यात आला आहे. "दुसऱ्या सदस्याला कमी लेखणं मल पटलेलं नाही", असं अंकिता म्हणते. त्यावर जान्हवी म्हणते, "अंकिता योग्य कारण दे. माझा खेळ घाणेरडा होता का?". सूरज कॅप्टन असल्यामुळे आणि संग्रामने नुकतीच वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्याने या आठवड्यासाठी ते दोघेही सेफ आहेत. 

दरम्यान, धष्टपुष्ट शरीरयष्टी असलेल्या संग्राम चौगुलेने वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतल्याने खेळात मोठा ट्विस्ट आला आहे. आता बिग बॉसचा खेळ अधिक रंजक होताना दिसत आहे. यामुळे घरातील समीकरणं बदलणार आहेत. तर आता दुसऱ्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीचीही चर्चा होऊ लागली आहे. 
 

Web Title: bigg boss marathi 5 nomination task ankita walawalkar and janvhi killekar fight for immunity video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.