Bigg Boss Marathi 5: नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्यांची तू-तू मैं-मैं! कोण कोणाला करणार नॉमिनेट? प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 11:56 AM2024-09-02T11:56:08+5:302024-09-02T11:58:47+5:30

Bigg Boss Marathi 5: गेल्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क हा गुप्तपणे पार पडला होता. या आठवड्यात मात्र हे नॉमिनेशन कार्य सदस्यांसमोरच पार पडणार आहे. त्यामुळे सगळ्यांसमोरच सदस्यांना प्रतिस्पर्ध्याला थेट नॉमिनेट करावं लागणार आहे.

Bigg Boss Marathi 5 nomination task at house who will nominate for the week watch video | Bigg Boss Marathi 5: नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्यांची तू-तू मैं-मैं! कोण कोणाला करणार नॉमिनेट? प्रोमो समोर

Bigg Boss Marathi 5: नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्यांची तू-तू मैं-मैं! कोण कोणाला करणार नॉमिनेट? प्रोमो समोर

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला एक महिना पूर्ण होऊन आता सहावा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद असल्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. पण, या आठवड्यात मात्र एका सदस्याचा घरातील प्रवास संपणार आहे. त्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. गेल्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क हा गुप्तपणे पार पडला होता. या आठवड्यात मात्र हे नॉमिनेशन कार्य सदस्यांसमोरच पार पडणार आहे. त्यामुळे सगळ्यांसमोरच सदस्यांना प्रतिस्पर्ध्याला थेट नॉमिनेट करावं लागणार आहे. 

यंदाच्या नॉमिनेशन टास्कचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या टास्कमध्ये असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या सदस्यांना रद्दीत टाकून नॉमिनेट करायचं आहे. या व्हिडिओत घरातील गार्डन एरियात नॉमिनेशन कार्य पार पडत असल्याचं दिसत आहे. यामध्ये समोर घरातील सदस्यांचे फोटो ठेवले आहेत. त्याबरोबरच कचरा पेटीही ठेवण्यात आली आहे. ज्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहे. त्याचा फोटो फाडून तो कचरा पेटीत टाकायचा आहे. नॉमिनेशन टास्कदरम्यान सदस्यांमध्ये तू तू मै मै झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


या आठवड्यात वर्षा उसगावकर घराच्या कॅप्टन असल्यामुळे त्या सेफ आहेत. त्यामुळे सदस्यांना या आठवड्यात त्यांना नॉमिनेशन प्रक्रियेत नॉमिनेट करता येणार नाही. घरातील समीकरणंही बदलेली पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता या टास्कमध्ये कोणते सदस्य नॉमिनेट होतात, हे पाहणं रंजनकारक असणार आहे. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण

Web Title: Bigg Boss Marathi 5 nomination task at house who will nominate for the week watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.