Bigg Boss Marathi 5: क्या बात! सूरजने केला विषयच हार्ड, सगळ्यांना गुलीगत धोका देत मिळवला कॅप्टन होण्याचा मान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 09:58 AM2024-09-06T09:58:03+5:302024-09-06T09:58:40+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : "हमारा कॅप्टन कैसा हो...", गुलीगत धोका देत सूरज चव्हाण बनला घराचा कॅप्टन

bigg boss marathi 5 suraj chavan becomes captain for this week in house promo | Bigg Boss Marathi 5: क्या बात! सूरजने केला विषयच हार्ड, सगळ्यांना गुलीगत धोका देत मिळवला कॅप्टन होण्याचा मान

Bigg Boss Marathi 5: क्या बात! सूरजने केला विषयच हार्ड, सगळ्यांना गुलीगत धोका देत मिळवला कॅप्टन होण्याचा मान

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठी टास्क पार पडला. घराचा कॅप्टन होऊन एका आठवड्यासाठी स्वत:ला सेफ करण्यासाठी सदस्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली. प्रत्येकालाच घराचा कॅप्टन व्हायचं होतं. पण, सूरज चव्हाणने सगळ्यांना गुलीगत धोका आणि बुक्कीत टेंगूळ देत यंदाच्या आठवड्यात घराचा कॅप्टन होण्याचा मान मिळवला.  

बिग बॉसच्या घरातून कॅप्टन्सी कंटेन्डरची बस सुटली. या बसचा प्रवासी होऊन सदस्यांना कॅप्टन्सी कार्यात भाग घ्यायचा आहे. प्रत्येक फेरीत काही सदस्य बाद होत गेले. आधीच्या फेरीत बाद झालेल्या सदस्याला पुढच्या फेरीत कोणाला बाद करायचे याचा निर्णय घ्यायचा होता. या कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरज चव्हाणने बाजी मारली आणि तो घराचा कॅप्टन झाला. 


सूरज कॅप्टन झाल्यानंतर घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये घरातील सगळेच सदस्य कॅप्टन झाल्यानंतर त्याच्या झापुक झुपूक स्टाइलने त्याचं अभिनंदन करताना दिसत आहेत. "हमारा कॅप्टन कैसा हो, सूरज चव्हाण जैसा हो" असं सगळे म्हणताना दिसत आहेत. 

दरम्यान, या आठवड्यात एकूण ७ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्यांनी घनश्याम दरवडे, सूरज चव्हाण, आर्या जाधव, अभिजीत सावंत, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, धनंजय पोवार यांना नॉमिनेट केलं आहे. गेल्या आठवड्यात वोटिंग लाइन्स बंद असल्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. पण, या आठवड्यात मात्र एका स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे. 
 

Web Title: bigg boss marathi 5 suraj chavan becomes captain for this week in house promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.