आता मी एकटाच लढणार! पॅडी घराबाहेर पडल्यानंतर सूरज भावुक, म्हणतो- "ते गेल्यानंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 06:04 PM2024-09-30T18:04:22+5:302024-09-30T18:09:59+5:30

पॅडीने घराचा निरोप घेतल्यानंतर मात्र आता सूरज भावुक झाला आहे.

bigg boss marathi 5 suraj chavan gets emotional after paddy kamable eviction said i will lift this season trophy | आता मी एकटाच लढणार! पॅडी घराबाहेर पडल्यानंतर सूरज भावुक, म्हणतो- "ते गेल्यानंतर..."

आता मी एकटाच लढणार! पॅडी घराबाहेर पडल्यानंतर सूरज भावुक, म्हणतो- "ते गेल्यानंतर..."

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी पंढरीनाथ कांबळेने बिग बॉस मराठीच्या घरातून एक्झिट घेतली. बिग बॉस मराठीच्या घरात असताना पॅडीने सूरज चव्हाणला फूल सपोर्ट दिला होता. टास्कबरोबरच घरातही तो कायमच सूरजच्याच बाजूने उभं राहिल्याचं पाहायला मिळालं. जातानाही पॅडीने सूरजबद्दल केलेल्या वक्तव्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. "मी आयुष्यभरासाठी सूरजचं पालकत्व घेतोय", असं तो म्हणाला.  पॅडीने घराचा निरोप घेतल्यानंतर मात्र आता सूरज भावुक झाला आहे. 

सूरजचा बिग बॉस मराठीच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सूरज घरातील बाल्कनीत एकटाच बसल्याचं दिसत आहे. सूरज म्हणतो, "पॅडीदादा गेल्यामुळे माझं मन भरुन आलं. डोळ्यातून पाणी आलं. आपला जवळचा माणूस गेल्यावर खूप वाईट वाटतं. पण, ह्या घरात एकट्यासाठीच लढायचंय. आणि ते प्रयत्न मी करणार. मी खचणार नाही. जिद्दीने मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार. जिद्दीने उभं राहणार आणि बिग बॉसची ट्रॉफी सूरज चव्हाणच जिंकणार...झापुक झुपूक पॅटर्नमध्येच घरी नेणार". 


सूरजला बिग बॉस मराठीच्या घरात पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे बिग बॉसला ट्रोलही करण्यात आलं होतं. पण, सूरजने त्याच्या खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. आता सूरजला चाहत्यांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. सूरजने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरावं अशी त्याच्या चाहत्यांचीही इच्छा आहे. 

दरम्यान, या आठवड्यात 'बिग बॉस मराठी'चा हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता मिळणार आहे. आता घरात राहिलेल्या वर्षाताई, अभिजीत, अंकिता, सूरज, जान्हवी, निक्की, धनंजय या सदस्यांपैकी कोण 'बिग बॉस मराठी'ची ट्रॉफी नावावर करणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

Web Title: bigg boss marathi 5 suraj chavan gets emotional after paddy kamable eviction said i will lift this season trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.