वर्षा उसगावकरांचा अपमान केल्यानंतर एकट्या सूरजने घेतली बाजू; निक्कीला दाखवली चूक, बोलतीच केली बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 11:57 AM2024-08-01T11:57:12+5:302024-08-01T11:57:44+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestant : वर्षा उसगावकरांचा अपमान केल्यानंतर घरातले सगळे गप्प, एकट्या सूरजने घेतली बाजू, निक्कीला चांगलंच सुनावलं

bigg boss marathi 5 suraj chavhan took varsha usgaonkar side pointed out mistake of nikki tamboli | वर्षा उसगावकरांचा अपमान केल्यानंतर एकट्या सूरजने घेतली बाजू; निक्कीला दाखवली चूक, बोलतीच केली बंद

वर्षा उसगावकरांचा अपमान केल्यानंतर एकट्या सूरजने घेतली बाजू; निक्कीला दाखवली चूक, बोलतीच केली बंद

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी ५' अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासूनच निक्की तांबोळीने अख्खं घर डोक्यावर घेतलं आहे. कोणत्याही छोट्या कारणावरुन निक्की आणि वर्षा उसगावकर यांच्यात वाद होताना दिसत आहेत. निक्कीने वर्षा उसगावकर यांच्याशी वाद घालताना त्यांच्यासाठी अरे तुरेची भाषा वापरली. तिने वर्षा उसगावकर यांची थेट अक्कलही काढली. पण, यामध्ये घरातील कोणताच सदस्य काहीच बोलला नाही. पण, सर्वांना गुलिगत धोका देत आता सूरजने निक्कीला चांगलंच सुनावलं आहे. 

बिग बॉसने या आठवड्यात सदस्यांना बेडवर झोपता येणार नाही, असं सांगितलं होतं. पण, वर्षा उसगावकर आणि घरातील काही इतर सदस्यांनी बेडचा वापर केला. त्यामुळे आता हा संपूर्ण आठवडा सदस्यांना जमिनीवरच झोपावं लागणार आहे. यावरुन निक्कीने वर्षा उसगावकरांबरोबर वाद घातला होता. "तुम्ही बेडवर बसलात, म्हणून आम्हाला भोगावं लागतंय", असं ती म्हणाली होती. आता निक्कीला सूरज चव्हाणने तिची चूक दाखवून देत तिच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. बिग बॉसच्या घरातील नवा प्रोमो समोर आला आहे. 

या प्रोमोमध्ये सूरज, निक्की आणि वर्षा किचन एरियामध्ये दिसत आहेत. सूरज निक्कीला म्हणतो, "निक्की तू बेडवर बसली होती की नाही? मी तुला बघितलं". त्यावर निक्की त्याला उत्तर देते की "हो मी बसले होते". त्यानंतर सूरज तिला म्हणतो, "तू खूर्चीवर पण बसली होती. आपल्याला भोगावं लागतंय". मग निक्की त्याला म्हणते की "खूर्चीवर बसू शकतो. पण, बेडवर बसू नाही शकत. माझ्याकडून चूक झाली. मी माफी मागते". त्यानंतर मग वर्षा उसगावकर आणि निक्कीमध्ये पुन्हा वाद सुरू झाल्याचं व्हिडिओत दिसत आहेत. 


दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, धनंजय पवार, पुरूषोत्तमदादा पाटील हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार हे येत्या वीकेंडला कळेल. 

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक 

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण
 

Web Title: bigg boss marathi 5 suraj chavhan took varsha usgaonkar side pointed out mistake of nikki tamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.