'हिला जसं खेळायचं तसं खेळते अन्...'; बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकाने अंकिताला सुनावलं, सूरजला सपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 10:48 AM2024-09-20T10:48:31+5:302024-09-20T10:49:02+5:30

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधील अंकिता वालावलकरवर बिग बॉसची माजी स्पर्धक मीरा जगन्नाथने राग व्यक्त केलाय (bigg boss marathi 5)

Bigg Boss Marathi ex-contestant mira jagannath angry on ankita walawalkar and support suraj chavan | 'हिला जसं खेळायचं तसं खेळते अन्...'; बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकाने अंकिताला सुनावलं, सूरजला सपोर्ट

'हिला जसं खेळायचं तसं खेळते अन्...'; बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकाने अंकिताला सुनावलं, सूरजला सपोर्ट

बिग बॉस मराठीची सध्या उत्सुकता शिगेला आहे. या सीझनमध्ये विविध स्वभावाचे स्पर्धक सहभागी आहेत. या स्पर्धकांची सध्या चांगलीच चर्चा आहे. बिग बॉस मराठीमध्ये काल अंकिता वालावलकर सूरज चव्हाणला खेळ समजावताना दिसली. सूरज बोलताना मध्ये बोलला त्यामुळे अंकिता त्याला सांगताना दिसली. अंकिताच्या याच म्हणण्यावर बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकाने राग व्यक्त केलाय. मीरा जगन्नाथने सोशल मीडियावर याविषयी पोस्ट केलीय.

मीराने अंकिताविरुद्ध पोस्ट करुन केला राग व्यक्त

मीराने सोशल मीडियावर पोस्ट करुन अंकिताला टॅग करुन राग व्यक्त केलाय. 'हिला जसं खेळायचं तसं खेळते आणि दुसऱ्यांना अडवते. असं नको खेळू तसं नको खेळू. सूरज तू लढ बापू!' अशी पोस्ट करुन मीराने अंकिताला राग व्यक्त केलाय. मीराच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला सपोर्ट दर्शवला आहे. अंकिता वालावकर अनेकदा सूरज चव्हाणला सपोर्ट करावा. त्यामुळे मीराने राग व्यक्त केलाय. 


कॅप्टनसी टास्क रंगणार

'बिग बॉस मराठी'च्या घरात सतत कोणा ना कोणामध्ये वाद होत असतात. घरात आता खेळाला रंग चढू लागला आहे. आठव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. या कॅप्टनसी कार्यात कोण जिंकणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार हे पाहताना प्रेक्षकांना मात्र येईल. त्यामुळे या टास्कमध्ये कोण जिंकून घराचा नवीन कॅप्टन कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
 

 

Web Title: Bigg Boss Marathi ex-contestant mira jagannath angry on ankita walawalkar and support suraj chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.