So Hot! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा भलताच बोल्ड अंदाज; बिकिनीत केलं हॉट फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 12:33 PM2024-07-02T12:33:53+5:302024-07-02T12:37:50+5:30

मराठी अभिनेत्रीचं बिकिनीत बोल्ड फोटोशूट, हॉट फोटोंनी घातला धुमाकूळ

'बिग बॉस मराठी'मधून अभिनेत्री मीरा जगन्नाथ प्रसिद्धीझोतात आली. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात मीरा सहभागी झाली होती.

मीरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा मीरा तिचे हॉट फोटो शेअर करताना दिसते.

नुकतंच मीराने बिकिनीत बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मीरा भलतीच बोल्ड झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा हॉट अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

मीराचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तिच्या बिकिनीतील फोटोंनी चाहत्यांचं वक्ष वेधून घेतलं आहे.

मीराने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत ती झळकली होती.

'येऊ कशी तशी मी' नांदायला मालिकेतील मोमो ही मीराने साकारलेली भूमिकादेखील प्रचंड गाजली.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतही मीरा महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेत तिने साक्षी ही भूमिका साकारली होती.