मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगचं १० वर्षांनी कमबॅक! 'या' मराठी मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 12:48 PM2024-09-25T12:48:20+5:302024-09-25T12:48:52+5:30

पुष्कर जोग या मराठी मालिकेच्या माध्यमातून अनेक वर्षांनी अभिनयक्षेत्रात कमबॅक करणार आहे (pushkar jog)

Bigg Boss Marathi fame marathi actor pushkar jog will be seen in savlyachi janu savali serial zee marathi | मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगचं १० वर्षांनी कमबॅक! 'या' मराठी मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगचं १० वर्षांनी कमबॅक! 'या' मराठी मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी झाले आहेत. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनबद्दल बिग बॉस मराठीचे माजी स्पर्धक त्यांचं परखड मत व्यक्त करत असतात. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनचा उपविजेता आणि अभिनेता पुष्कर जोग सुद्धा सोशल मीडियावर वेळोवेळी व्यक्त होत असतो. अशातच पुष्करच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुष्कर अनेक वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक करतोय. 

पुष्कर जोग दिसणार या मराठी मालिकेत

मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगने एका मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या मालिकेचं नाव 'सावळ्याची जणू सावली'. या मालिकेत पुष्कर विशेष भूमिकेत झळकणार आहे. मालिकेच्या प्रोमोत पुष्करचा वेगळा अंदाज आणि प्रभावी अभिनय सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. पुष्कर या मालिकेच्या माध्यमातून तब्बल १० वर्षांनी मालिकाविश्वातील मराठी मालिकेत अभिनय करताना दिसणार आहे. पुष्करला पुन्हा अभिनय करताना पाहून त्याच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झालाय. याआधी पुष्कर २०१४ साली 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' या मालिकेत झळकला होता.


पुष्कर आणि मेघा धाडे एकत्र

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे सुद्धा झळकणार आहे. यानिमित्ताने एक खास योग जुळून आलाय. तो म्हणजे बिग बॉस मराठीचे विजेते आणि उपविजेते एकाच मालिकेत झळकणार आहेत. मेघा धाडेने बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनचं विजेतेपद पटकावलं होतं. तर पुष्कर उपविजेता होता. त्यामुळे या दोघांना एकाच मालिकेत अभिनय करताना पाहण्यास त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील, यात शंका नाही.

Web Title: Bigg Boss Marathi fame marathi actor pushkar jog will be seen in savlyachi janu savali serial zee marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.