आजी म्हणजे काय? दुधावरची साय… लाडक्या आजीचा वाढदिवस शिवने असा बनवला खास, व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 09:01 AM2024-10-18T09:01:18+5:302024-10-18T09:07:14+5:30

'बिग बॉस मराठी' फेम शिव ठाकरे त्याच्या साधेपणाने कायमच चाहत्याचं लक्ष वेधून घेत असतो.

bigg boss marathi fame shiv thakare celebrate her beloved grand mother birthday video viral on social media | आजी म्हणजे काय? दुधावरची साय… लाडक्या आजीचा वाढदिवस शिवने असा बनवला खास, व्हिडीओ व्हायरल 

आजी म्हणजे काय? दुधावरची साय… लाडक्या आजीचा वाढदिवस शिवने असा बनवला खास, व्हिडीओ व्हायरल 

Shiv Thakare Video : 'बिग बॉस मराठी' फेम शिव ठाकरे(Shiv Thakare) त्याच्या साधेपणाने कायमच चाहत्याचं लक्ष वेधून घेत असतो. आपला साधेपणा, मनमिळाऊ स्वभावामुळे त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तसेच शिव ठाकरेने त्याचं नृत्यकौशल्य तसेच दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंस केलं. दरम्यान, सोशल मीडियावर शिव ठाकरेचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. त्याचा हा व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. 


शिव ठाकरेने नुकताच सोशल मीडियावर एक सुंदर असा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलंय. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या लाडक्या आजीचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आजी आणि नातवाचं प्रेम पाहून नेटकरी देखील भारावले आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला शिव त्याच्या आजीला गाडीत बसवून गेटवे ऑफ इंडियाला घेऊन जातो. त्यानंतर बोटीमध्ये केक कापून लाडक्या आजीचा वाढदिवस अगदी छान पद्धतीने साजरा करतो. शिव आणि त्याच्या आजीमध्ये असलेलं बॉण्डिंग या व्हिडीओच्यामधून प्रकर्षाणे जाणवतंय. नातवानं आजीला दिलेलं सरप्राईज आणि आजीचा आनंद सगळंच पाहण्यासारखं आहे. त्यानंतर तो आजीला पंचतारांकित हॉटेल ताजमध्ये घेऊन जातो. तिथे नातू आजी निवांत गप्पा मारत बसल्याचं पाहायला मिळतंय. शिवचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शिवाय  या  “विथ बर्थडे गर्ल #आजी” असं कॅप्शन देत शिव ठाकरेने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

मुळचा अमरावतीचा असलेला शिव हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तो 'बिग बॉस १६' मध्ये दिसला. पण, सलमान खानच्या या रिॲलिटी शोने त्याला चांगलीच ओळख मिळवून दिली. यासोबतच तो रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी सीझन १३'मध्ये झळकला.

Web Title: bigg boss marathi fame shiv thakare celebrate her beloved grand mother birthday video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.