'छोटा पुढारी' घनश्याम दरोडे पोहचला मुंबईत, निक्की-अरबाजची घेतली भेट! पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 11:19 AM2024-11-10T11:19:01+5:302024-11-10T11:19:26+5:30

छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडेने मुंबई गाठून निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलची भेट घेतली. 

Bigg Boss Marathi Ghanshyam Darode Aka Chota Pudhari Meets Nikki Tamboli Arbaz Patel In Mumbai Video | 'छोटा पुढारी' घनश्याम दरोडे पोहचला मुंबईत, निक्की-अरबाजची घेतली भेट! पाहा VIDEO

'छोटा पुढारी' घनश्याम दरोडे पोहचला मुंबईत, निक्की-अरबाजची घेतली भेट! पाहा VIDEO

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन संपून आता बरेच दिवस झाले आहेत. पण या शोमधल्या स्पर्धकांच्या भेटीगाठी सुरुच आहेत.  गेल्या काही दिवसांत बिग बॉसच्या घरातील धनंजय पोवार, वैभव चव्हाण, इरिना आणि जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावलकर यांनी सूरजच्या गावी जात त्याची भेट घेतली होती. तर आता दुसरीकडे छोटा पुढारी अर्थात  घनश्याम दरोडेने  (Ghanshyam Darode) मुंबई गाठून निक्की तांबोळी (Nikki Tamboli)आणि अरबाज पटेलची भेट घेतली. 

'बिग बॉस मराठी'च्या घरात छोटा पुढारी आणि निक्की तांबोळीमध्ये बहिण-भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळाले होते. आता घनश्याम दरोडे याने त्याच्या इन्स्टाग्रामवर निक्की-अरबाजच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे.  "माझी निक्कू ताई आणि अरबाजची भेट" असं कॅप्शन त्याने दिले आहे. आता निक्की आणि अरबाजदेखील २५ डिसेंबरला  घनश्याम दरोडेच्या वाढदिवशी त्याच्या गावी जाणार आहेत. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्या दिवसापासून दोन गट पडले होते. यापैकी एका गटात निक्की, अरबाज, वैभव, जान्हवी आणि घन:श्याम एकत्र खेळत होते. पण, काही दिवसांनी त्याच्या टीममध्ये फूट पडली.  जान्हवी आणि वैभवने स्वतंत्रपणे आपला खेळ खेळण्यास सुरुवात केली. मात्र, निक्की, अरबाज आणि घन:श्याम शेवटपर्यंत एकत्र राहिले. आता अगदी घराबाहेर आल्यावर सुद्धा या तिघांनी आपली मैत्री जपली आहे. 

Web Title: Bigg Boss Marathi Ghanshyam Darode Aka Chota Pudhari Meets Nikki Tamboli Arbaz Patel In Mumbai Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.