Bigg Boss Marathi : बाहेर आल्यावर सई आणि पुष्कर स्टुपिड वाटतात : मेघा धाडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 06:09 PM2018-08-13T18:09:24+5:302018-08-13T18:10:45+5:30

बिगबॉसचा सिझन संपल्यावर सई लोकूर आणि पुष्कर जोग यांनी बाहेर येऊन ज्याप्रकारे मुलाखती दिल्या आहेत, ते बघितल्यावर ते मला स्टुपिड वाटतात अशी खरमरीत टीका मराठी बिगबॉस कार्यक्रमाच्या विजेत्या मेघा धाडे यांनी केली आहे. 

Bigg Boss Marathi : Megha Dhade Says after come out I found Sai and Pushkar are Stupid | Bigg Boss Marathi : बाहेर आल्यावर सई आणि पुष्कर स्टुपिड वाटतात : मेघा धाडे 

Bigg Boss Marathi : बाहेर आल्यावर सई आणि पुष्कर स्टुपिड वाटतात : मेघा धाडे 

googlenewsNext

 

पुणे : बिगबॉसचा सिझन संपल्यावर सई लोकूर आणि पुष्कर जोग यांनी बाहेर येऊन ज्याप्रकारे मुलाखती दिल्या आहेत, ते बघितल्यावर ते मला स्टुपिड वाटतात अशी खरमरीत टीका मराठी बिगबॉस कार्यक्रमाच्या विजेत्या मेघा धाडे यांनी केली आहे. 

        पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्टा उपक्रमाच्या अंतर्गत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते. यावेळी बोलताना धाडे यांनी बिगबॉसबद्दल अनेक खुलासे केले. 

          त्या म्हणाल्या की, सई आणि पुष्कर मला बाहेर आल्यावर फेक(खोटी) म्हणतात. मात्र त्यांना माहिती आहे या कार्यक्रमात खोटं वागून चालत नाही.मी आहे तशी वागून विजेती झाले ही गोष्ट त्यांना पचलेली नाही.मी त्यांची मैत्री शेवटपर्यंत निभावण्याचा प्रयत्न केला. मात्र मला समजायला माझे मित्र कमी पडले असेही त्या म्हणाल्या.भविष्यात  आस्ताद काळे चांगला मित्र राहील पण पुष्कर राहणार नाही असेही त्यांनी जाहीर केले. 

            हा कार्यक्रमाचे संवाद लिहिलेले असतात का यावरही त्यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, इथे कोणीही कोणाला काही सांगत नाही. आतमध्ये गेल्यावर तुम्हालाच तुमचे खेळावे लागते. इतकेच नव्हे तर हा कार्यक्रम स्क्रिप्टेड केल्यास त्याची सर्व मजा निघून जाईल असे त्या म्हणाल्या. इतके कॅमेरे दिवसरात्र सुरु असताना १०० दिवस अभिनय करत राहणे अशक्य आहे. त्यामुळे तुमच्यातला माणूस इथे दिसतोच असेही त्या म्हणाल्या. 

Web Title: Bigg Boss Marathi : Megha Dhade Says after come out I found Sai and Pushkar are Stupid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.