रितेश देशमुखची सुरज चव्हाणला मोठी मदत, आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून दिली खास भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:12 PM2024-10-08T16:12:56+5:302024-10-08T16:14:20+5:30
'बिग बॉस' जिंकलेल्या सुरजसाठी अभिनेता रितेश देशमुखने मोठा निर्णय घेतला आहे.
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा (Bigg Boss Marathi Season 5) ग्रँड फिनाले रविवारी (६ ऑक्टोबर) मोठ्या जल्लोषात पार पडला. अभिजीत सावंत व सूरज चव्हाण टॉप २ सदस्य होते. त्यापैकी सूरज चव्हाणने (Suraj Chavan) यंदाच्या पर्वाची ट्रॉफी जिंकली. तर गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) उपविजेता ठरला. शो जिंकल्यावर सूरज चव्हाणला १४.६ लाख रुपये मिळाले आहेत. 'बिग बॉस' जिंकलेल्या सुरजसाठी अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) मोठा निर्णय घेतला आहे.
सूरज चव्हाण फक्त आठवी पर्यंत शिकलेला आहे, त्याचा स्वभावही मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक असा आहे. त्यामुळे त्याच्या या साध्याभोळ्या स्वभावाचा कुणीही फायदा घेऊ नये आणि त्याची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी रितेश देशमुखने सुरजासाठी एक खास गोष्ट केली आहे. रितेशने त्याच्या संपर्कातील एक विश्वासू मॅनेजर सुरजला दिला आहे.
सुरज म्हणाला, "आता मला इथून पुढे स्वत:ला उभं राहायचंय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मला खचयाचं नाहीये. सगळ्या गोष्टी मला स्वत: करायच्या आहेत. रितेश सरांनी मला खूप मोठा सपोर्ट केलाय. त्यांनी मला त्यांच्या जवळचा एक पीए दिला. ते म्हणाले, तू काळजी घे तुझी, फसवणूक होऊ देऊ नको… तु समजून घे... मी एक माणूस देतो त्याच्या संपर्कात नेहमी राहा असं त्यांनी सांगितलंय". नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत सूरजने याविषयी खुलासा केला.
'बिग बॉस' जिंकलेल्या सूरजचा हा प्रवास सोपा नव्हता. त्याने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. सूरज उदरनिर्वाहासाठी मजुरी करायचा, त्याला ३०० रुपये मिळायचे. नंतर तो टिकटॉवर व्हिडीओ करून प्रसिद्ध झाला. तेव्हा तो चांगली कमाई करू लागला. पण, तो सुशिक्षित नसल्याने अनेकांनी त्याची फसवणूक केली होती.