"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 01:44 PM2024-09-27T13:44:49+5:302024-09-27T13:45:39+5:30

Bigg boss marathi season 5 Contestants: अरबाज म्हणतो, 'निक्कीला राग येणार साहजिकच आहे पण...'

Bigg boss marathi season 5 Arbaz Patel clarifies that he is not married or engaged all are rumours | "माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'

"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात अरबाज पटेल (Arbaz Patel) आणि निक्की तांबोळीची (Nikki Tamboli) जोडी चांगलीच गाजली. दोघांमधील लव्ह अँगलची चर्चा झाली. मागच्या आठवड्यात अरबाज एलिमिनेट झाल्याने निक्कीला धक्का बसला. ती पूर्णपणे खचली होती. सध्या घरात फॅमिली वीक सुरु आहे. यात निक्कीची आई लेकीला भेटायला आली आहे. दरम्यान निक्कीच्या आईने तिला अरबाजचा साखरपुडा झाल्याचं सांगितलं. हे ऐकून निक्कीला राग आला. आता यावर अरबाजने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

अरबाज पटेलने काही दिवसांपूर्वी तो कमिटेड असल्याचं मान्य केलं होतं. पण त्याचा साखरपुडा झाला आहे का की लग्न झालं आहे यावर तो काहीच बोलला नव्हता. दुसरीकडे तो बाहेर गेल्यानंतर निक्कीला दुरावा सहन होत नाहीए. मात्र आता आईने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे तिला प्रचंड राग आला आहे. तिने अक्षरश: अरबाजच्या वस्तू फेकून देण्यास बिग बॉसला सांगितलं. याचा प्रोमो कलर्सने शेअर केला आहे.


यावर आता अरबाज पटेलने इन्स्टाग्राम थ्रेडवर ऑडिओ शेअर केला आहे. तो म्हणतो, "मी आताच प्रोमो पाहिला. निक्कीची आई तिला सांगत आहे की लोक बोलत आहेत ती अरबाजचा साखरपुडा झाला आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की असं काही नाहीए. ना माझा साखरपुडा झालंय ना माझं लग्न झालंय. या अफवा आहेत. आता निक्कीला तर राग येणारच कारण तिला बाहेर काय घडतंय याची कल्पना नाही. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही भेटू तेव्हा मी तिला सांगेन. तिने ऐकलं तर ठिके नाहीतर काही हरकत नाही. पण या सगळ्या अफवा आहेत."

अरबाज पटेल लिझा बिंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत. लिझाने अरबाज बिग बॉसमध्ये असताना त्याच्यासाठी पोस्टही केल्या होत्या. मात्र त्यांचा साखरपुडा झाला नसल्याचं अरबाजने स्पष्ट केलं आहे.

 

Web Title: Bigg boss marathi season 5 Arbaz Patel clarifies that he is not married or engaged all are rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.