Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'

By ऋचा वझे | Published: September 24, 2024 05:29 PM2024-09-24T17:29:38+5:302024-09-24T17:30:46+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी दोघंही छत्रपती संभाजीनगरचे आहेत. अरबाज कोणत्या कॉलेजमध्ये शिकला माहितीये का?

Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel says he wull go to Chhatrapati Sambhajinagar along with Nikki | Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'

Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सर्वच स्पर्धक आता महाराष्ट्रात ओळखीचे झाले आहे. येत्या काही दिवसात बिग बॉस मराठी 5 चा ग्रँड फिनाले रंगणार आहे. शिवाय शो १०० नव्हे तर ७० दिवसातच निरोप घेतोय. त्यापूर्वीच अरबाज पटेल (Arbaz Patel) हा स्ट्राँग स्पर्धक घराबाहेर पडला आहे. अरबाजने नुकतंच एका मुलाखतीत निक्कीसोबतचे प्लॅन्स सांगितले. विशेष म्हणजे तो निक्कीला घेऊन छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे असा त्याने उल्लेख केला. 

खूप कमी जणांना माहित आहे की अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) दोघंही छत्रपती संभाजीनगरचे आहेत. निक्कीचं बालपण तिथलं तर आहे तर अरबाजचं पूर्ण शिक्षण तिथेच झालं आहे. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला, "मी छत्रपती संभाजीनगरमध्येच लहानाचा मोठा झालो. देवगिरी कॉलेजमध्ये शिकलो. अजूनही मी तिथेच राहतो. आता परत घरीच जाणार आहे. निक्की सुद्धा छत्रपती संभाजीनगरची आहे. तिथे ती कुठे राहायची हे तिने मला सांगितलं. आता मी तिला घेऊन छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे. मी तिला सांगितलं आहे की ती लहानपणी जिथे गेली होती तिथे मी तिला घेऊन जाईन. बिग बॉस फिनालेनंतर आम्ही दोघंही छत्रपती संभाजीनगरला जाऊन तिथे फिरताना तुम्हाला नक्कीच दिसू."

याशिवाय अरबाज म्हणाला, "निक्की बाहेर आल्यानंतर आमचे बरेच प्लॅन्स आहेत. आम्ही काही म्युझिक अल्बम मध्येही दिसणार आहे. तसंच पुढे  एकत्र काम करणार आहे."


बिग बॉसच्या या सीझनमध्ये अरबाज-निक्कीची जोडी भलतीच गाजली. अरबाज एलिमिनेट होताच निक्कीची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. दोघांनी घरात एकमेकांना उत्तम साथ दिली. आता निक्कीला घरात एकटंच खेळावं लागणार आहे. तसंच निक्कीनेच ट्रॉफी जिंकावी अशी त्याने इच्छा व्यक्त केली आहे.

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel says he wull go to Chhatrapati Sambhajinagar along with Nikki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.