"मी लोकांची मनं जिंकण्यात कमी पडले" जान्हवीने व्यक्त केल्या भावना; म्हणते,'म्हणून मी पैशांची बॅग...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 11:19 AM2024-10-08T11:19:57+5:302024-10-08T11:21:51+5:30

'बिग बॉस मराठी'चा ग्रॅंड फिनाले अगदी मोठ्या दिमाखात पार पडला आहे.

bigg boss marathi season 5 contestant janhvi killekar reveald in interview about why she walked off from grand finale with 9 lakhs rupees  | "मी लोकांची मनं जिंकण्यात कमी पडले" जान्हवीने व्यक्त केल्या भावना; म्हणते,'म्हणून मी पैशांची बॅग...'

"मी लोकांची मनं जिंकण्यात कमी पडले" जान्हवीने व्यक्त केल्या भावना; म्हणते,'म्हणून मी पैशांची बॅग...'

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'चा ग्रॅंड फिनाले अगदी काही दिवसांपूर्वीच पार पडला आहे. यंदाचं हे पर्व चांगलच गाजलं. 'बिग बॉस'च्या घरात स्पर्धकांमधील वाद-विवाद, मज्जामस्ती या सगळ्या कारणांमुळे शो चर्चेचं कारण ठरला. दरम्यान, या पर्वात काही स्पर्धकांचीही जोरदार चर्चा झाली. त्यातील एक म्हणजे जान्हवी किल्लेकर होती. जान्हवीने 'बिग बॉस'च्या घरात सुरुवातीच्या काळात  केलेल्या वक्तव्यामुळे प्रचंड ट्रोलिंग सामना करावा लागला. त्यामुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. तरीही जान्हवीन तिच्या दमदार खेळीच्या जोरावर या पर्वाच्या फिनालेपर्यंत मजल मारली. त्यानंतर जान्हवीने या स्पर्धेतून शेवटच्या क्षणी माघार घेतली. पैशांनी भरलेली बॅग की ट्रॉफी असा प्रश्न समोर होता. यावेळी जान्हवीने पैशांची बॅग उचलून घर सोडलं.


नुकतीच जान्हवीने 'बिग बॉस मराठी'च्या घराबाहेर आल्यानंतर  लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. त्यादरम्यान जान्हवीने अनेक गोष्टींचा खुलासा केला. या मुलाखतीत जान्हवी म्हणाली,"पैसे महत्वाचे आहेत पण तो माझ्यासाठी सेकंडरी पार्ट होता. मला तेव्हा कुठेतरी माहित होतं की, इतक्या सहजासहजी महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील राग कमी झाला असेल का? आणि तो झालाच असेत तर तो फक्त ७० टक्के कमी झाला असेल. कुठेतरी ३० टक्के लोकांच्या मनात वोट करताना या गोष्टीचा विचार नक्कीच येणार की जर 'बिग बॉस मराठी'चा विजेता ठरवायचा असेल तर मी आधी जे काही वागले, बोलले त्या गोष्टी लोकांच्या मनात नक्कीच येतील. हा विचार मी तेव्हा केला".

पुढे जान्हवी म्हणाली, "जे काही आम्ही टॉप-६ स्पर्धक होतो त्याच्यांमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की सूरज,अभिजीत आणि निक्कीला चांगले वोट्स येत आहेत. मी अंकिता आणि डीपीदादा आम्हाला तिघांनाही कमी वोट्स मिळत होते. तेव्हा मी हा विचार केला तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर राहून लोकांच्या लक्षात नाही राहणार, लोक विसरून जातात. तेव्हा मी प्रॅक्टिकल विचार केला. जर महाराष्ट्राने मला टास्क क्वीन म्हणून नाव दिलंय, तूला शेवटचा टास्क खेळायचं आहे हा विचार माझ्या डोक्यात होता". 

"मला त्यावेळी असं वाटलं महाराष्ट्र अजूनही माफ करत नाही तर काय प्रायश्चित करू. बाहेरचे नाही तर घरातील लोकांसाठीही मी तेव्हा खूप काही केलं. सात दिवस जेलमध्ये राहिले, सगळ्यांची सेवा केली, तरीही कुठेतरी लोकांची मनं जिंकण्यात कमी पडले". असा खुलासा जान्हवीने या मुलाखतीत केला. 

Web Title: bigg boss marathi season 5 contestant janhvi killekar reveald in interview about why she walked off from grand finale with 9 lakhs rupees 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.