"उगा आवाज करणाऱ्यांची तोंडं बंद करत तू, कॅप्टन झाला", मराठी अभिनेत्याला वाटतोय सूरज चव्हाणचा हेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 01:54 PM2024-09-07T13:54:36+5:302024-09-07T13:57:42+5:30

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनची मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

bigg boss marathi season 5 marathi actor abhijeet kelkar shared post on social media to support suraj chavan after become captain | "उगा आवाज करणाऱ्यांची तोंडं बंद करत तू, कॅप्टन झाला", मराठी अभिनेत्याला वाटतोय सूरज चव्हाणचा हेवा

"उगा आवाज करणाऱ्यांची तोंडं बंद करत तू, कॅप्टन झाला", मराठी अभिनेत्याला वाटतोय सूरज चव्हाणचा हेवा

Abhijeet Kelkar Post : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनची मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. या सीझनप्रमाणे त्यातील स्पर्धकही अनेकदा प्रेक्षकांच्या निशाण्यावर येतात. दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या या पर्वातील सहाव्या आठवड्यात गुलीगत किंग सूरज चव्हाणला घराचा कॅप्टन होण्याचा मान मिळाला आहे. 'बिग बॉस'च्या घरातील कॅप्टन पदाची धूरा आता त्याच्या खांद्यावर आली आहे. अशातच सूरज 'बिग बॉस'च्या घराचा नवा  कॅप्टन झाल्याने त्याचे चाहते प्रचंड खुश आहेत. कॅप्टन झाल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेताअभिजीत केळकरने सूरजला सपोर्ट करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

सूरज चव्हाण घराचा कॅप्टन झाल्यानंतर घरातील इतर सदस्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. या निमित्ताने त्या सगळ्यांनी एकत्र येऊन जंगी सेलिब्रेशन देखील केलं. दरम्यान, बारामतीचा पठ्या सूरज कॅप्टन झाल्यावर अभिजीत केळकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सूरजला सपोर्ट करणारी पोस्ट शेअर केल्याचं पाहायला मिळतंय. या पोस्टमध्ये अभिजीतने लिहलंय, "गुलीगत भावा, सूरज चव्हाण उगाच आवाज करणाऱ्यांची तोंडं बंद करत तू, कॅप्टन झालास, लई म्हंजी लैच आनंद झाला". असं लिहित अभिनेत्याने सूरजला पाठिंबा दर्शवला आहे.

नुकताच 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या आठवड्यात कॅप्टन्सीचा टास्क पार पडला. त्यासाठी कॅप्टन्सी कंटेन्डरची बस 'बिग बॉस'च्या घरात सूटली. या कॅप्टन्सीच्या शर्यतीत सूरजने बाजी मारली आणि तो घराचा कॅप्टन झाला. 

Web Title: bigg boss marathi season 5 marathi actor abhijeet kelkar shared post on social media to support suraj chavan after become captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.