Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 08:52 AM2024-09-28T08:52:54+5:302024-09-28T08:53:36+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: राखी सावंतला पाहून नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

Bigg Boss Marathi Season 5 Rakhi Sawant and Abhijeet Bichukle enters house nikki tamboli shocking reaction | Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल

Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन लवकरच संपणार आहे. यावेळी १०० नव्हे तर ७० दिवसात शो संपतोय. सध्या घरात सदस्यांना त्यांचे कुटुंबीय भेटायला येत आहेत. तर आजच्या एपिसोडमध्ये सदस्यांना सरप्राईज मिळणार आहे. कारण बिग बॉसच्या आधीच्या पर्वातले सदस्य अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) हे घरात एन्ट्री करणार आहेत. राखीच्या येण्याने घरात सदस्यांचं चांगलंच मनोरंजन होणार आहे. तसंच तिला पाहताच निक्की तांबोळीची (Nikki Tamboli) काय अवस्था होते हे पाहायला मजा येणार आहे.

बिग बॉसच्या घरात निक्कीचा ठणाणा पाहता सर्वांनीच राखी सावंतला आणा अशी मागणी केली होती. अखेर 'ड्रामा क्वीन' राखीची घरात एन्ट्री होत आहे. कलर्सने नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये घरातील सर्व सदस्यांना स्तब्ध होण्यास सांगितलं आहे. तेवढ्यात दार उघडतं आणि घरात राखी सावंतची एन्ट्री होते. गुलाबी ड्रेसमध्ये राखी डान्स करत येते. 'हॅलो बिग बॉस तुमची पहिली बायको' असं ती म्हणते. राखीला पाहताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू  येतं. पण निक्की मात्र म्हणते, 'हाय रब्बा'. राखी निक्कीला पाहताच म्हणते, 'निक्की, सस्ती राखी सावंत. आता घरात चालणारे माझाच ठणाणाणा...निक्की तांबोळी, सोडून येणार तुला आंबोली.'


निक्की तांबोळी आणि राखी सावंत दोघीही बिग बॉस हिंदीच्या १४ व्या पर्वात सहभागी होते. तीन वर्षांपूर्वी हा सीझन आला होता. घरात दोघींची जबरदस्त भांडणं झाली होती. आता इतक्या वर्षांनी पुन्हा निक्की आणि राखी समोरासमोर आल्या आहेत. 'राखीशिवाय सीझन पूर्ण होऊ शकत नाही', 'चला शेवट तरी गोड होतोय' अशा मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या  आहेत.

राखी आल्याने घरात फुल मनोरंजन होत असल्याचं पाहायला मिळत आहे.तिच्या येण्याने घराची राणी निक्कीची काय अवस्था होते हे पाहायला मजा येणार आहे. शिवाय अभिजीत बिचुकलेंनीही घरात एन्ट्री घेतली आहे. ते सदस्यांमध्ये कशी भांडणं लावतात याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.

६ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठी सीझन ५ चा ग्रँड फिनाले रंगणार आहे. सध्या घरात वर्षा, अभिजीत, पॅडी, निक्की, जान्हवी, सूरज, धनंजय आणि अंकिता असे आठ स्पर्धक राहिले आहेत. हे सर्वच या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. यांच्यातील कोणता सदस्य बाहेर पडतो याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Rakhi Sawant and Abhijeet Bichukle enters house nikki tamboli shocking reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.