'गुलीगत धोका' देऊन 'बुक्कीत टेंगूळ' म्हणत कशी केली भन्नाट रील्सची सुरुवात? सूरज म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 11:26 AM2024-08-08T11:26:18+5:302024-08-08T11:27:12+5:30

Bigg Boss Marathi season 5: एका एपिसोडमध्ये सूरजने त्याच्या हटके व्हिडिओची सुरुवात कशी झाली हे सांगितलं.

Bigg Boss Marathi season 5 Suraj Chavan reveals how he started his journey of doing videos | 'गुलीगत धोका' देऊन 'बुक्कीत टेंगूळ' म्हणत कशी केली भन्नाट रील्सची सुरुवात? सूरज म्हणाला...

'गुलीगत धोका' देऊन 'बुक्कीत टेंगूळ' म्हणत कशी केली भन्नाट रील्सची सुरुवात? सूरज म्हणाला...

Bigg Boss Marathi season 5: बिग बॉस मराठीच्या घरात बारामतीच्या 'गुलीगत धोका' फेम टिक टॉकस्टार सूरज चव्हाणने (Suraj Chavan)  प्रवेश केला आहे. बिग बॉस सुरु होऊन आता एक आठवडा उलटून गेला पण तरी सूरजला खेळ काही समजलेला नाही. तो अत्यंत साधा असल्याने त्याला या खेळाचे छक्केपंजे कळलेले नाहीत. दरम्यान धनंजय पोवार, पॅडीसारखी इतर मंडळी त्याला सांभाळून घेत आहेत. एका एपिसोडमध्ये सूरजने त्याच्या हटके व्हिडिओची सुरुवात कशी झाली हे सांगितलं.

एक दिवस अभिजीत सावंत, निखिल दामले, योगिता चव्हाण, अंकिता वालावलकर, आर्या आणि सूरज हे सर्व एकत्र गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा अभिजीत सावंत सूरजला विचारतो की तुला असेल व्हिडिओ बनवण्याचं कसं सूचलं? तेव्हा सूरज म्हणतो, 'माझा भाचा आहे ना वहिनीचा मोठा मुलगा त्याने मला सांगितलं की मामा तू रील बनव. तेव्हा बरेच जण व्हिडिओ बनवायचे. मलाही वाटलं आपल्या भावना कुठेतरी मांडाव्यात. एखाद्या व्हिडिओला खूप व्ह्यूज, लाईक्स मिळाले कीखूप आनंद होतो. एवढे फॅन बघून मला खूप आनंद व्हायचा. मी सतत किती लाईक्स आले ते बघायचो. मी खोटं बोलणार नाही तेव्हा मला दिवसाला ६ हजार फोन यायचे. वेटिंगलाच असायचे.'


सूरज चव्हाणने आपल्या साधेपणाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता तो घरात कधीपर्यंत टिकून राहतो हे पाहणं महत्वाचं आहे. काल झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये सूरज चव्हाणही नॉमिनेट झाला. त्याच्यासह निक्की, छोटा पुढारी, निखिल दामले, योगिता चव्हाण आणि पॅडी हे देखील नॉमिनेट झाले आहेत.

Web Title: Bigg Boss Marathi season 5 Suraj Chavan reveals how he started his journey of doing videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.