"मला घरात बोलवा…", अरबाज-निक्कीचा राडा पाहून सुप्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 04:58 PM2024-08-28T16:58:59+5:302024-08-28T16:59:36+5:30
Bigg Boss Marathi Season 5 : ' बिग बॉस मराठी'च्या घरातील समीकरण पूर्णपणे बदलल्याचं दिसत आहे. निक्कीने ग्रुप A ...
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील समीकरण पूर्णपणे बदलल्याचं दिसत आहे. निक्कीने ग्रुप A सोडण्याचा निर्णय घेतला असून सध्या ती एकटीच खेळत आहे. कायम एकमेकांना साथ देणारे अरबाज व निक्की आता वेगळे झाले असून त्यांच्या जोरदार भांडण पाहायला मिळतंय. निक्की आणि अभिजीत जवळ आले असून त्यांच्या मैत्री वाढतेय. त्यांच्यातील मैत्री पाहून अरबाज मात्र चिडला. निक्की आणि अभिजीतवरील रागाच्या भरात अरबाजने घरातील वस्तूंची आदळाआपट केली. यावर आता मराठी अभिनेतापुष्कर जोगने प्रतिक्रिया दिली आहे.
निक्की आणि अरबाज यांनी बिग बॉसच्या घरात घातलेला राडा पाहून पुष्कर जोगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहलं, "हा कार्यक्रम अरबाज आणि निक्कीच्या लव्हस्टोरीबद्दल नाही. अरबाज-निक्की तुम्ही यातून पुढे जाणार आहात का? या घरात असं वागण्याला परवानगी आहे का? ही आक्रमकता? हे निंदनीय वर्तन? 'बिग बॉस' कृपया मला घरात बोलवा. घरातल्या इतर महिलांच्या विवेकाचा आदर करायला हवा. त्यांना भीती वाटू लागली आहे. पुरुषांनी ठाम भूमिका घ्यावी".
'बिग बॉस मराठी'च्या कालच्या भागात निक्कीममुळे अरबाजचा पारा चांगलाच चढला होता. निक्कीला गालातल्या गालात हसताना पाहून अरबाजचा राग अनावर होतो. तो रागाच्या भरात घरातील वस्तूंची आदळ-आपट करायला सुरुवात करतो. यावर निक्की ही अरबाजला 'काय आहे हा बालिशपणा?' असं म्हणते. त्यावर अरबाज तिला म्हणतो, 'तू मला हर्ट करतेय'. यावर दोघांमध्ये मोठा वाद होतो. तेव्हा निक्की अरबाजला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसून आली.
'बिग बॉस'च्या घरात काल केलेल्या आदळआपटमुळे अरबाजला याची शिक्षा मिळाली आहे. शिक्षा म्हणून अरबाजची या आठवड्यातील कॅप्टन्सीची उमेदवारी काढून घेण्यात आली आहे. 'बिग बॉस'च्या या निर्णयामुळे अरबाजला दु:ख होतं आणि तो रडू लागतो. तेव्हा घरातील बाकी सदस्य त्याची समजूत काढताना पाहायला मिळाले.