ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, विशाखा सुभेदार म्हणाल्या- "बाई आता तरी जिभेला आवर घाल"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 10:24 AM2024-08-22T10:24:46+5:302024-08-22T10:25:14+5:30

जान्हवीने बुधवारच्या एपिसोडमध्ये ढसाढसा रडत पॅडी कांबळेंची माफी मागितली.

Bigg Boss Marathi Season 5 vishakha subhedar shared pos on Jahnavi Killekar apology towards pandharinath kamble | ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, विशाखा सुभेदार म्हणाल्या- "बाई आता तरी जिभेला आवर घाल"

ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, विशाखा सुभेदार म्हणाल्या- "बाई आता तरी जिभेला आवर घाल"

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने (Jahnavi Killekar) थेट पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे (Paddy Kamble) यांच्या अभिनयाबाबत आणि करिअरच्या मुद्यावर अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी जान्हवीच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. तर, काही प्रेक्षकांनी जान्हवीला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची मागणी केली. यानंतर जान्हवीने बुधवारच्या एपिसोडमध्ये ढसाढसा रडत पॅडी कांबळेंची माफी मागितली. मात्र,  पॅडी कांबळेची मैत्रीण आणि अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी जान्हवीने मागितलेली माफी हे नाटक असल्याचे म्हटले आहे. 

जान्हवीने पॅडीची माफी मागितल्यावर विशाखा सुभेदार यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. त्यांनी लिहलं, "माफ केलं तुला असं नाही म्हणालाय तो…पण, मनाचा मोठेपणा मात्र दाखवलायं. Its Ok. म्हणजे ठीक आहे असं म्हणालाय… Actor आहे तो, आम्ही रोज हे भाव भावनांचं विश्व घेऊन हिंडतो. पाठमोरा माणूस सुद्धा काय म्हणतं असेल हे कळू शकतं आम्हाला, कारण तोच तर आमचा धंदा आहे. त्या अनुभवी माणसाला अश्रू खरे- खोटे कळले नसतील? तरीही तुझ्या खोट्या अश्रूंना तो Its Ok म्हणाला.. कारण, तो खरंच बापमाणूस आहे…! त्याने दिला असेल विषय सोडून. पण बाई आता तरी जिभेला आवर घाल. More power to Paddy Kamble"

पुढे त्यांनी बुधवारच्या एपिसोडचं सार सांगतं लिहलं, "काल काय झालं…बाहेरच्या जगात सुद्धा मी तुझं रक्षण करेन… असं रक्षाबंधन साजरं झालं.. शॉपिंग झाली, माफी मागणं ही नौटंकी झाली, कॅप्टन बदलला आणि तेच जास्त बोलले… Mike वरून". . यासोबतच विशाखा यांनी  #aplapaddy #संयमकायम #actor हे हॅशटॅग देत पडी कांबळेंसाठी "लढ बापू" असं म्हटलं आहे. 

काय म्हणाली होती जान्हवी ?

बिग बॉस मराठीच्या घरात 'सत्याचा पंचनामा' या टास्कच्या ब्रेक दरम्यान  जान्हवीने पॅडी कांबळेंच्या अभिनय क्षेत्रातील कारर्किदीवरून अपमान केला. जान्हवी रागाच्या भरात मोठ्या आवाजात पॅडी कांबळेला उद्देशून म्हणाली, "पॅडीदादाच्या काहीतरी अंगात घुसलंय. आयुष्यभर ओव्हरअ‍ॅक्टिंग करुन करुन दमले. आता तीच ओव्हरअ‍ॅक्टिंग घरात दाखवत आहेत." पॅडीने हे ऐकलं. त्याने अंकिताजवळ शांतपणे त्याची बाजू मांडली. पण तो जान्हवीला काही बोलला नाही. पॅडीने ज्या शांतपणे प्रकरण हाताळलं, त्याचं कौतुक होत आहे. तर वाद झाल्यानंतर जान्हवीला आपली चूक लक्षात आली आणि तिने पॅडी कांबळेची रडत हात जोडून माफी मागितली. यावर मनाचा मोठेपणा दाखवत पॅडीनेदेखील तिला माफ केलंय. 


Web Title: Bigg Boss Marathi Season 5 vishakha subhedar shared pos on Jahnavi Killekar apology towards pandharinath kamble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.