Bigg Boss OTT 3 Eimination : चाहते हैराण, 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वातून 'हा' स्पर्धक बेघर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 01:52 PM2024-07-03T13:52:21+5:302024-07-03T13:52:43+5:30

 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वामधील एका स्पर्धकाचा प्रवास संपला आहे.

Bigg Boss Ott 3 Elimination Poulomi Das Has Been Eliminated From The House | Bigg Boss OTT 3 Eimination : चाहते हैराण, 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वातून 'हा' स्पर्धक बेघर

Bigg Boss OTT 3 Eimination : चाहते हैराण, 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वातून 'हा' स्पर्धक बेघर

'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे.  बिग बॉसच्या घरात कधी काय धमाका होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आता एक मोठे अपडेट समोर आले आहे.  'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वामधील एका स्पर्धकाचा प्रवास संपला आहे. कमी वोट मिळाल्यामुळे नव्हे तर लवकेश कटारियाने या स्पर्धकाला घराबाहेरचा रस्ता दाखवला.  'बिग बॉस' मधून मिळालेल्या अधिकाराचा वापर लवकेश कटारियाने केला. 

बिग बॉसच्या घरात  पौलोमी दास, चंद्रिका दीक्षित, मुनीषा खटवानी, शिवानी कुमारी, नॅजी आणि विशाल पांडेय हे नॉमिनेट झाले. या नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांना टास्क देण्यात आला होता. यावेळी टास्क करून चंद्रिका दीक्षित, शिवानी कुमारी, नॅजी आणि विशाल यांनी स्व:ताचा बचाव केला. पण, बॉटममध्ये असलेली पौलोमी आणि मुनीषामधून एका स्पर्धकाला एलिमिनेट करण्याचा निर्णय बिग बॉसने लवकेश कटारियावर सोपावला. यावेळी पौलमीला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय लवकेश कटारियाने घेतला. 

'खबरी या फॅन पेजवरून ही माहिती समोर आली आहे. पौलोमीने 'सुहानी सी एक लडकी','काया','दिल ही तो है','बारीश' सारख्या गाजलेल्या मालिका आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.  अनिल कपूर होस्ट करत असलेल्या बिग बॉसच्या या पर्वात घरातून आतापर्यंत पोलमी, नीरज गोयत  आणि पायल मलिक हे स्पर्धक बाहेर पडले आहेत. यातच आता बिग बॉसच्या घरात एक वाइल्ड कार्ड एन्ट्री होण्याची चर्चां सुरू आहे. घरात कोण येणार, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. 

Web Title: Bigg Boss Ott 3 Elimination Poulomi Das Has Been Eliminated From The House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.