कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 09:49 AM2024-11-05T09:49:55+5:302024-11-05T09:50:24+5:30
बिग बॉस फेम अभिनेत्रीने कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने लग्न केलं असून सर्वांनी तिच्या निर्णयाची प्रशंसा केलीय.
'बिग बॉस ओटीटी ३' फेम सना सुल्तानने लग्न केलंय. सनाने मदीनामध्ये मोहम्मद वाजिद सोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नाचे फोटो सनाने सोशल मीडियावर शेअर करुन सर्वांना ही आनंदाची बातमी दिलीय. सनाने अचानक लग्नाची बातमी सर्वांना सांगितल्याने तिने सर्वांना सुखद धक्का दिलाय. सनाने पतीचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला नाहीय. लग्नाचे फोटो शेअर करुन सनाने भलंमोठं कॅप्शन फोटोंना लिहिलं आहे.
कोण आहे सना सुल्तानचा पती?
सनाने लग्नाचे फोटो शेअर करताच तिचे बिग बॉसमधील आणि इंडस्ट्रीतील तिचे मित्र-मैत्रिणी अर्थात साई केतन राव, जुबेर खान, मुनीषा खतवानी यांनी तिचं कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदन केलंय. सनाने तिच्या पतीचे चेहरा सोशल मीडियावर दाखवला नाही. सनाच्या पतीचं नाव मोहम्मद वाजिद असं आहे. मोहम्मद हे झीटीव्हीशी संबंधित आहेत. याशिवाय बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्राशी त्यांचा संबंध असल्याची माहिती मिळतेय. एकूणच मोहम्मद हे कॅमेरामागे काम करतात.
कोणताही गाजावाजा न करता केलं लग्न
सना सुल्तानने कोणताही गाजावाजा न करता साध्यापद्धतीने मदीनामध्येच लग्न केलं. "नात्याला वाईट नजरेपासून वाचवलं. आमच्या नात्याचा सन्मान करण्याची मी शपथ घेतलीय.", असं कॅप्शन तिने या फोटोला लिहिलंय. सनाला लग्न साधेपणाने करण्याची इच्छा होती. तिला कोणताही झगमगाट मान्य नव्हता. त्यामुळे कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत सनाने जीवनाची नवी सुरुवात केलीय.