Video:"तुझ्यात हिंमत असेल तर.."; 'एल्विश आर्मी'च्या सपोर्टवरुन अनिल कपूर यांनी लवकेशला केलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 01:58 PM2024-06-30T13:58:42+5:302024-06-30T14:00:15+5:30

बिग बॉसमध्ये काल विकेंड का वारमध्ये एल्विश यादव फॅन्सचा सातत्याने सपोर्ट घेत असल्याने अनिल कपूर यांनी लवकेशला सुनावलंय. पुढे काय घडलं बघा (bigg boss ott 3)

bigg boss ott 3 host Anil Kapoor gave challenge to luvkesh kataria for the support of elvish yadav army | Video:"तुझ्यात हिंमत असेल तर.."; 'एल्विश आर्मी'च्या सपोर्टवरुन अनिल कपूर यांनी लवकेशला केलं चॅलेंज

Video:"तुझ्यात हिंमत असेल तर.."; 'एल्विश आर्मी'च्या सपोर्टवरुन अनिल कपूर यांनी लवकेशला केलं चॅलेंज

Bigg Boss OTT 3 ची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. Bigg Boss OTT 3 चं सूत्रसंचालन यंदा सलमान खान नाही तर अनिल कपूर करत आहेत. Bigg Boss OTT 3 पहिल्याच आठवड्यात विविध गोष्टींनी गाजलंय. यापैकी एक गोष्ट म्हणजे लवकेश कटारिया. लवकेश कटारियाने Bigg Boss OTT 3 मध्ये एन्ट्री करत असतानाच एल्विश यादवचं नाव घेतलं होतं. याशिवाय लवकेशला एल्विशच्या फॅन्सचा मोठा सपोर्ट मिळतोय. याच मुद्द्याला धरुन बिग बॉसच्या पहिल्या वीकएंड का वार मध्ये अनिल कपूर यांनी लवकेशची चांगलीच शाळा घेतली.

अनिल कपूर यांनी लवकेशला दिलं खुलं चॅलेंज

Bigg Boss OTT 3 मध्ये नवीन प्रोमो व्हायरल झाला. यात अनिल कपूर लवकेशला सांगतात, "जिनकी कहानिया नही चल रही होती उनके सिर्फ कमेंट्स होते है." पुढे अनिल कपूर यांनी विशाल पांडे आणि लवकेश या दोघांनाही सुनावलं. "सिस्टम 2.0, कटारिया द विक्टरी, वी आर विशालीयन्स तुमच्या पोस्टवर कमेंट करणारे हे लोक कोण आहेत? तुम्ही लोकांवर कोणता प्रभाव पाडत आहात, याची तुम्हाला जाणीव नाही. सर्व फक्त एक नंबर गेम झालाय. तुमच्यात तर हिंमत असेल तर तुम्ही आता बोला की, कोणीही एल्विशचा माणूस तुम्हाला सपोर्ट करणार नाही." असं खुलं आव्हान अनिल कपूर यांनी लवकेशला दिलं.

लवकेशने फॅन्सना केली ही विनंती

अनिल कपूर यांना उत्तर देताना लवकेशने त्याच्या चाहत्यांबद्दल सांगितले की, "मला वाटतं माझे फॅन्स ही माझी फॅमिली आहे. याशिवाय फॅन्सना मला लाईव्ह बघायला आवडतं." अनिल कपूर यांनी सुनावताच लवकेश पुढे चाहत्यांना म्हणाला, "एल्विशचा फॅनबेस आणि कोणीही एल्विशचा माणूस मला सपोर्ट करणार नाही. मी घरात जे बोलतोय त्यावरुन मला सपोर्ट करा." असं आवाहन लवकेशने त्याच्या चाहत्यांना केलं.

Web Title: bigg boss ott 3 host Anil Kapoor gave challenge to luvkesh kataria for the support of elvish yadav army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.