Bigg Boss OTT: राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्‍यामध्‍ये निर्माण होतेय जवळीक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 07:48 PM2021-08-27T19:48:17+5:302021-08-27T19:48:51+5:30

बिग बॉस ओटीटी घरामध्‍ये शमिता शेट्टी व राकेश बापट यांच्‍यामधील वाढती ज‍वळीक सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

Bigg Boss OTT: Rakesh Bapat and Shamita Shetty form a bond | Bigg Boss OTT: राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्‍यामध्‍ये निर्माण होतेय जवळीक

Bigg Boss OTT: राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्‍यामध्‍ये निर्माण होतेय जवळीक

googlenewsNext

बिग बॉस ओटीटी घरामध्‍ये शमिता शेट्टी व राकेश बापट यांच्‍यामधील वाढती ज‍वळीक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. त्‍यांच्‍या कनेक्‍शनने नुकतेच त्‍यांच्‍या सकाळी 'किस' घेत उठवण्‍याच्‍या प्रथेसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. पण मागील एपिसोडमध्‍ये नॉमिनेशन टास्‍कच्‍या वेळी दोघांमध्‍ये काही गैरसमज निर्माण झाले. परिणामत: राकेश व शमिता त्‍यांच्‍या निर्णयांमागील एकमेकांचा दृष्टिकोन समजू शकले नाहीत आणि एकमेकांना सांभाळून घेऊ शकले नाहीत. शेवटी त्‍यांच्‍यामध्‍ये वादविवाद झाला आणि ते त्‍या स्थितीचे निराकरण करू शकले नाहीत. 

तसेच राकेशसोबत खरे कनेक्‍शन निर्माण करण्‍याची इच्‍छा असलेली शमिता तिच्‍या चिंतांसंबंधित समस्‍यांचा उल्‍लेख करणा-या संवादाकडे दुर्लक्ष करण्‍याचा प्रयत्‍न करताना दिसण्‍यात आली. त्‍यानंतर समस्‍येचे निराकरण करून स्थिती सुरळीत करण्‍याच्‍या विचारासह दोघेही गार्डन क्षेत्रामध्‍ये बसले आणि त्‍यांनी समस्‍येचे निराकरण करण्‍याचे ठरवले. ते एकमेकांचा हात धरून बसले तेव्‍हा राकेशने त्‍याच्‍या जीवनातील खडतर काळाबाबत सांगितले. तसेच जीवनातील चढ-उतारांबाबत सांगितले, ज्‍याबाबत त्‍याने कोणालाच सांगिले नव्‍हते. 


अभिनेत्‍याने त्‍याच्‍या बालपणी व प्रौढ काळात सामना केलेल्‍या समस्‍या सांगितल्‍या. राकेशने घटस्‍फोट घेण्‍याच्‍या जीवनाला कलाटणी देणा-या निर्णयाचा त्‍याच्‍यावर किती परिणाम झाला याबाबत सांगितले, तसेच त्‍याच्‍या वडिलांच्‍या मृत्‍यूचा त्‍याच्‍यावर किती परिणाम झाला याबाबत देखील सांगितले.


राकेश खूपच भावूक झाला आणि म्‍हणाला की, त्‍याने चिंताग्रस्‍त होण्याच्या स्थितीचा सामना केला. तो पुढे म्‍हणाला, ''मी सलग दोन आठवडे झोपलो नाही.'' त्‍याची आई व बहिणीला त्‍याची दयनीय स्थिती पाहून किती दु:ख झाले होते याबाबत देखील अभिनेत्‍याने सांगितले. 


तो म्‍हणाला, ''मी खचून जाण्‍याच्‍या टप्‍प्‍यावर होतो.'' राकेशने त्‍यानंतर जीवनात स्थिरतेचा शोध घेणे किती अवघड आहे आणि त्‍याला समजून घेणारे कोणीतरी पाहिजे याबाबत सांगितले. शेवटी शमिता व राकेश यांनी पुढील काळ आनंददायी असण्‍याच्‍या आशेसह एकमेकांमधील वाद संपवला. लगेचच बिग बॉसने घोषणा केली की, ते या आठवड्यात नॉमिनेशन्‍सपासून सुरक्षित होते. 

Web Title: Bigg Boss OTT: Rakesh Bapat and Shamita Shetty form a bond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.