लग्नाआधी कतरिना राहत होती भाड्याच्या घरात, महिन्याला किती भाडे द्यायची माहितीय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 05:41 PM2021-12-13T17:41:06+5:302021-12-13T17:41:13+5:30

सिनेमांसोबतच मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून कतरिना (katrina Kaif ) कोट्यवधी रुपये कमावते. एका रिपोर्टनुसार कतरिनाकडे 240 कोटींची संपत्ती आहे.

Billionaire Katrina Kaif, used to stay in rented home, check the rent she used to pay, details here | लग्नाआधी कतरिना राहत होती भाड्याच्या घरात, महिन्याला किती भाडे द्यायची माहितीय?

लग्नाआधी कतरिना राहत होती भाड्याच्या घरात, महिन्याला किती भाडे द्यायची माहितीय?

googlenewsNext

अभिनेत्री कतरिना कैफने नुकतंच अभिनेता विकी कौशलसह लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. कतरिना तिच्या लग्नामुळे चर्चेत असताना काही खासगी गोष्टींमुळेही चर्चेत आहे. कतरिनानं अल्पावधीतच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नंबरची अभिनेत्री हे स्थान मिळवलं होतं. बराच काळ कतरिना नंबर वन पदावर होती आणि आजही तिची जादू कायम आहे. त्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या बॅनर्सचे सिनेमा कतरिनाकडे आहेत. बडे दिग्दर्शक कतरिनाला सिनेमात घेण्यासाठी उत्सुक असतात. २००३ सालापासून हिंदी चित्रपटसृष्टीत कतरिना नाव कमावतेय. सुरुवातीला कतरिना तिच्या एका सिनेमासाठी सहा ते सात कोटींच्या घरात मानधन घेत होती. काळनुसार तिच्या मानधनातही तिने वाढ केली.

 

सिनेमांसोबतच मॉडेलिंग, ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आणि जाहिरातींच्या माध्यमातून कतरिना कोट्यवधी रुपये कमावते. एका रिपोर्टनुसार कतरिनाकडे 240 कोटींची संपत्ती आहे. याशिवाय तिच्याकडे बड्या कंपन्यांच्या महागड्या आलिशान कार आहेत. मात्र भारतात तिचं हक्काचं घर नव्हतं. लग्नाआधीपर्यंत कतरिना  भाड्याच्या घरात राहत होती. 

सुरुवातीच्या काळात कॅट वांद्रे इथल्या गुलदेव सागर अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला होती. २०१४ साली ती त्यावेळचा बॉयफ्रेंडरणबीर कपूरसह कार्टर रोडच्या सिल्वर सेंड अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती. मात्र दोघांचं ब्रेकअप झालं. तरीही काही काळ कॅट त्याच घरात राहत होती. या घराचे सुमारे १५ लाख रुपये प्रति महिना भाडे होते. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना वांद्रे इथल्या माऊंट मेरी चर्चजवळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली. मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तसंच स्वप्न कोट्यवधीची मालकीण असणाऱ्या कॅटचंही असावं.लग्नानंतर आता विकी कौशलसोबत सी फेसिंग आलिशान फ्लॅटमध्ये या कपलचा संसार सुरु होणार आहे. नवीन घराचे व्हिडीओही समोर आले होते. 

Web Title: Billionaire Katrina Kaif, used to stay in rented home, check the rent she used to pay, details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.