मराठी चित्रपटसृष्टीतील बायोपिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2016 07:27 PM2016-04-06T19:27:24+5:302016-04-06T12:27:24+5:30

बॉलीवुडमध्ये बायोपिकचे प्रमाण जास्त असले तरी त्या तुलनेत मराठी चित्रपटनगरीला फार कमी बायोपिक मिळाले आहेत. बायोपिकमुळे एखादया यशस्वी व़्यक्तीची ...

Biopic in Marathi cinema | मराठी चित्रपटसृष्टीतील बायोपिक

मराठी चित्रपटसृष्टीतील बायोपिक

googlenewsNext
लीवुडमध्ये बायोपिकचे प्रमाण जास्त असले तरी त्या तुलनेत मराठी चित्रपटनगरीला फार कमी बायोपिक मिळाले आहेत. बायोपिकमुळे एखादया यशस्वी व़्यक्तीची कारर्कीद तरूणांसमोर उभे राहते. जेणेकरून तरूणांना यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळते. यशस्वी व्यक्तीच्या कारकीर्दीवर असणारे हे बॉलीवुड बायोपिक जसे की, भाग मिल्खा भाग, मेरी कोम, नीरजा, साला खडूस हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. तर अझहर, एम.एस.धोनी, रईस, दंगल यांसारखे बायोपिकदेखील प्रदर्शित होण्यास सज्ज झाली आहेत. तर मराठी चित्रपटसृष्टीत डॉ.प्रकाश बाबा आमटे,बालगंधर्व, मी सिंधूताई सपकाळ,लोकमान्य: एक युगपुरूष, झेंडा, बाळकडू यांसारखे बायोपिकने देखील प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तर संघर्षयात्रा, अलबेला हे बायोपिकदेखील प्रदर्शित होण्यास तयार झाली आहेत. अशाच काही बायोपिकचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला आढावा.

डॉ. प्रकाश बाबा आमटे: समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य केले आहे. त्यांनी कुष्ठलोकांसाठी केलेली समाजसेवा ही प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. समृद्धी पोरे दिग्दर्शित डॉ. प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट १० आॅक्टोबर २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात डॉ. प्रकाश आमटे यांची भूमिका अभिनेता नाना पाटेकर यांनी पार पाडली होती. तर मंदाकिनी आमटे यांची भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केली होती. हा चित्रपट अजून ही प्रेक्षक आवर्जुन पाहत आहेत. या चित्रपटाने बॉक्सआॅफीसवर करोंडो रूपयांचा गल्ला कमविला होता. 



बालगंधर्व: बालगंधर्व हे संपूर्ण देशातच नावाजलेले कलावंत होते. त्यांच्या गायनाने मराठीच नव्हे तर अमराठी रसिकांना ही वेड लावून ठेवले होते. अशा या दिग्गज कलावंताने मराठी रंगभूमीला खºया अर्थाने श्रीमंती मिळवून दिली आहे. आशा या महान व्यक्तीमहत्वाचे कर्तत्व आजच्या तरूणांना माहित पडावे यासाठी रवी जाधव दिग्दर्शित बालगंधर्व हा चित्रपट ६ मे २०११ रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. अभिनेता सुबोध भावे याने आपल्या अभिनयाने बालगंधर्व या भूमिकेला चार चॉद लावले आहे. तसेच या चित्रपटालादेखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.



मी सिंधूताई सपकाळ: हे नाव आज ही सामाजिक क्षेत्रात सर्व प्रथम आवर्जुन घेतले जाते. सिंधुताई सपकाळ हे नाव या चित्रपटाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यत पोहोचले आहे. तसेच त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती तरूणांना खरचं प्रेरणा देणारी ठरली आहे. आज ही कित्येक तरूण सिंधूताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमाला मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे.अनंत महादेवन दिग्दर्शित मी सिंधूताई सपकाळ हा चित्रपट ३० आॅक्टोबर २०१० रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देखील प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तसेच अभिनेत्री तेजस्विनी पंडीत या अभिनेत्रीने केलेली सिंधूताई सपकाळ यांची भूमिका आज ही प्रेक्षकांमध्ये अविस्मरणीय राहिलेली आहे.



बाळकडू: बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय जीवनावर आधारित असलेला बाळकडू या चित्रपटाने प्रत्येक मराठी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. अतूल काळे दिग्दर्शित बाळकडू हा चित्रपट २३ जानेवारी २०१५ रोजी त्यांच्या जन्मदिना दिवशी प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात उमेश कामत, नेहा पेंडसे, प्रसाद ओक, सुप्रिया पाठारे, आनंद इंगळे, भालचंद्र कदम या तगडया कलाकारांचा या चित्रपटात समावेश होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंग्यचित्रकार ते राजकारण या प्रवासाची मांडणी अत्यंत सुंदररीत्या मांडली आहे. 



झेंडा: अवधूत गुप्ते दिग्दर्शित झेंडा हा चित्रपट २२ जाने २०१० रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट राज ठाकरे व उद्धव ठाकरे या बंधूवर असलेला हा राजकीय चित्रपट आहे. या चित्रपटाने तरूणांच्या मनावर आधिराज्य केले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, राजेश शृंगारपुरे, सचित पाटील, संतोष जुवेकर, पुष्कर श्रोती,सुनील तावडे, चिन्मय मांडलेकर, नेहा जोशी, ेजश्री प्रधान या तगडया कलाकारांचा समावेश आहे. आज ही हा चित्रपट तरूण आवर्जुन पाहतात. कार्यकर्ता म्हणून तरूणांचे काय स्थान असते याची मांडणी दिग्दर्शक अवधूत यांनी अत्यंत सुंदररीत्या तरूणांपर्यत पोहोचविली आहे. 
                                     
                                                                    
             

Web Title: Biopic in Marathi cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.