‘बायोपिक’ म्हणजे आव्हानच!

By Admin | Published: April 21, 2016 01:57 AM2016-04-21T01:57:35+5:302016-04-21T01:57:35+5:30

आत्मविश्वास, भूमिकेची जाणीव, गोड चेहरा, उत्तम अभिनय ही वैशिष्ट्ये लाभलेली नायिका म्हणजे प्राची देसाई. चित्रपटातील भूमिका कमी महत्त्वाची असली तरीही तिला किती महत्त्व मिळवून

'Biopic' means challenge! | ‘बायोपिक’ म्हणजे आव्हानच!

‘बायोपिक’ म्हणजे आव्हानच!

आत्मविश्वास, भूमिकेची जाणीव, गोड चेहरा, उत्तम अभिनय ही वैशिष्ट्ये लाभलेली नायिका म्हणजे प्राची देसाई. चित्रपटातील भूमिका कमी महत्त्वाची असली तरीही तिला किती महत्त्व मिळवून द्यायचे हे तिने तिच्या अभिनयातून ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ आणि ‘लाईफ पार्टनर’ मधून दाखवून दिले आहे. संयम, सकारात्मकता आणि योग्य संधीची निवड करणं हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेषच म्हणावे लागेल. यंदा रिलीज होणारा तिचा बिग बजेट चित्रपट ‘अझहर’च्या निमित्ताने प्राचीने नुकतीच सीएनएक्सला विशेष मुलाखत दिली. बायोपिकचे आव्हान, ‘अझहर’ मधील तिची व्यक्तीरेखा, सह कलाकार, याबाबत तिने अगदी मनमोकळया गप्पा मारल्या.
प्रश्न : यंदा तुझ्या हातात दोन मोठे चित्रपट आहेत. काय सांगशील?
प्राची : अझहर आणि रॉक आॅन-2 हे दोन अत्यंत वेगळ्या कथानकावर आधारित चित्रपट या वर्षात मला मिळाल्याने मी खूप आनंदात आहे. यातील माझ्या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या आहेत. ‘रॉक आॅन- 2 आणि ‘अझहर’ या माझ्या दोन्ही चित्रपटांकडे मी मोठ्या आशेने पाहत आहे. मी यात इमरान आणि फरहान अख्तर यांच्यासोबत काम करणार असून या भूमिकांसाठी विशेष मेहनत घेतली आहे.

प्रश्न : ‘अझहर’च्या शूटिंगचा अनुभव कसा राहिला?
प्राची : ‘अझहर’ची शूटिंग हैदराबादेत झाली. मला हैदराबाद हे शहर खूप आवडते. त्यामुळे शूटिंगदरम्यान मी फार आनंदात होते. या शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पुन्हा जुने दिवस साकारण्यात खरी मजा येते. माहिती नसलेल्या काळाला प्रेक्षकांसमोर उभे करणे हे खूप मोठे चॅलेंज असते.

प्रश्न : नौरीनच्या व्यक्तीरेखेबाबत काही सांग?
प्राची : मला माझे दिग्दर्शक टॉमी यांनी नौरीनच्या व्यक्तीरेखेविषयी सर्व सांगितले होते. ती अजहरची पहिली पत्नी आहे. मी तिचीच भूमिका साकारतेय. बायोपिकसाठी काम करणं अर्थात खूप जास्त अवघड असते. तुमच्याकडे त्या व्यक्तीच्या संदर्भात काहीही माहिती नसते आणि तुम्हाला केवळ सूत्रांवर अवलंबून रहावे लागते. तुम्हाला त्याची बॉडी लँग्वेज, मानसिकता सर्वच स्वत:मध्ये आत्मसात करून घ्यावे लागते.

प्रश्न : इमरानसोबतच्या केमेस्ट्रीबाबत काय सांगशील?
प्राची : इमरान माझ्यासोबत पडद्यावर खूप चांगला दिसतो. अजहर आणि नौरीन यांची भूमिका आम्ही दोघांनीही एन्जॉय केली. आम्ही वास्तविक आयुष्यातील भूमिका प्रथमच साकारतोय. इमरान अतिशय चांगला माणूस आहे. तो खूप संयमी आणि सुविचारी आहे. क ाळाच्या ओघात त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. स्क्रिनवर तो एक उत्तम अभिनयाने नटलेला अभिनेत्याची भूमिका साकारतो.

प्रश्न : फॅशनबाबत काही प्रयोग करतेस का?
प्राची : मला फॅशन करायला आवडते. पण त्यापेक्षाही जास्त मला मी जशी आहे तशीच राहायला आवडते. ‘रॉक आॅन-2’ मधील माझे शॉर्ट हेअर माझ्या व्यक्तिमत्त्वात बदल दर्शवितात. मला असं वाटतं की, तुमचे व्यक्तिमत्त्व हे स्क्रीनवरील व्यक्तीमत्त्वापेक्षा वेगळे असले पाहिजे.

प्रश्न : छोट्या पडद्यावर काम करायला तुला आवडेल?
प्राची : हो, काही नाही... पण, मला डेली सोप्समध्ये काम करायला कधीच आवडत नाही. खरंतर त्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या लवकर कनेक्टमध्ये येतो. पण, डेली सोप्ससाठी काम करणं हे चित्रपटांत काम क रण्यापेक्षा अगदीच वेगळे आहे.

Web Title: 'Biopic' means challenge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.