नऊ वर्षांचे जॉन आणि बिपाशाचं नातं 'या' एका चुकीमुळे संपलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 01:38 PM2020-01-06T13:38:31+5:302020-01-06T13:45:58+5:30

कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का.

Bipasha basu here know about her relationship? | नऊ वर्षांचे जॉन आणि बिपाशाचं नातं 'या' एका चुकीमुळे संपलं

नऊ वर्षांचे जॉन आणि बिपाशाचं नातं 'या' एका चुकीमुळे संपलं

googlenewsNext

बिपाशा बासू अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत आनंदी आयुष्य जगते आहे. पण एक आयुष्यात एकवेळ अशी होती जेव्हा बिपाशा जॉन अब्राहमच्या प्रेमात आकंठ बुडली होती. मात्र एका चुकीमुळे दोघांचे नातं संपलं. बिपाशा आणि जॉनची जोडीला प्रेक्षक देखील पसंती द्यायचे. दोघांनी एकत्र अनेक सिनेमात काम केले. नऊ वर्षे बिपाशा आणि जॉन एकमेकांना डेट करत होते.   


महेश भट्ट यांच्या जिस्ममध्ये सिनेमातील शूटिंग दरम्यान जॉन आणि बिपाशा यांच्यातील जवळीक वाढली. ऐवढेच नाही तर दोघे लिव्हइन रिलेशनशीपमध्ये सुद्धा होते. २०१४ मध्ये जॉन अब्राहमने ट्विट केले. ‘आपणास २०१४च्या शुभेच्छा. यावर्षी आपल्या आयुष्यात प्रेम, चांगले भविष्य आणि आनंद घेऊन येवो. लव्ह, जॉन आणि प्रिया अब्राहम’ असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले होते. जॉनचे हे ट्विट पाहून त्याने सीक्रेट मॅरेज केल्याचे सगळ्यांना कळले. बिपाशासाठी तर हा फार मोठा धक्का होता.


जॉनचे हे ट्वीट पाहून बिपाशाचे मन तुटले. त्यानंतर अनके पुरुषांसोबत बिपाशाचे नाव जोडण्यात आले. एप्रिल 2016 मध्ये बिपाशा अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली.    


प्रियासोबत लग्न करण्यापूर्वी जॉन बिपाशासोबत तब्बल दहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. बिपाशा एका मुलाखतीत यावर बोलली होती. माझ्यासाठी या ब्रेकअपमधून बाहेर येणे कठीण होते. अचानक मला आमच्यात तिसरी व्यक्ती असल्याचे कळले , असे ती म्हणाली होती. 

Web Title: Bipasha basu here know about her relationship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.