अरे हे काय, बिपाशा बासूच्या नव-याने पुन्हा केले लग्न, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 07:31 PM2020-10-09T19:31:18+5:302020-10-09T19:36:29+5:30

'अलोन' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण दोघेही पहिल्यांदा भेटले होते.त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली होती. बघता-बघात त्यांच्या मैत्रीचे रूपातर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

Bipasha Basu Share Throwback Video With Husband Goes Viral | अरे हे काय, बिपाशा बासूच्या नव-याने पुन्हा केले लग्न, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

अरे हे काय, बिपाशा बासूच्या नव-याने पुन्हा केले लग्न, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

googlenewsNext

करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरते. विशेषतः तिसरं लग्न केल्याने करणसिंहला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. हे सगळं होत असताना अनेकांना करणसिंहने त्याची दुसरी पत्नी जेनिफर विंगेटशी काडीमोड का घेतला आणि बिपाशाशी लग्न का केलं हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्याने असं का केलं असा प्रश्न आजही अनेकांना पडतो.

 

करणचा आणखी एका फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोत तो पत्नी बिपाशा बासूची माँग भरताना दिसतोय. हा जुना फोटो आहे. बहुतेक लग्नानंतरचा फोटो असावा. हा फोटो शेअर करत त्याने पुन्हा एकदा त्याच्या लग्नाचे आठवणींना ऊजाळा दिला आहे. बिपाशानं 2016 मध्ये बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता करण सिंह ग्रोवरशी लग्न केलं होते. 

या व्हिडिओमध्ये बिपाशाचा आनंद ओसंडून वाहतोय. इतकेच नाही तर हा व्हिडिओ  शेअर करताना बिपाशाने कॅप्शनमध्ये समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. 'गेल्या वर्षी असे काही होते.' बिपाशा बसूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहतेही त्याला खूप पसंत करत आहेत. इतकेच नाही तर हा व्हिडिओ आतापर्यंत 99 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.दोघेही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असतात. बिपाशा बसू अखेरची 'अलोन' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती पती करणसिंग ग्रोव्हरसह मुख्य भूमिकेत झळकली होती.


'अलोन' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण दोघेही पहिल्यांदा भेटले होते.त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली होती. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचे रूपातर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 30 एप्रिल रोजी बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हरच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत. त्याच वेळी करण सिंग ग्रोव्हरबद्दल बोलताना अभिनेता नुकताच स्टार प्लस सीरियल 'कसौटी जिंदगी की 2' मध्ये श्री बजाजच्या भूमिकेत दिसला होता.
 

Web Title: Bipasha Basu Share Throwback Video With Husband Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.