बिपाशाने निभावली मैत्री

By Admin | Published: November 15, 2014 12:30 AM2014-11-15T00:30:23+5:302014-11-15T00:30:23+5:30

मैत्री निभावण्यात बिपाशा बासू कधीही मागे राहत नाही. सध्या ती तिचा फॅशन डिझायनर मित्र विक्रम फडणवीसची प्रशंसा करताना थकत नाही.

Bipashane Dostling Friendship | बिपाशाने निभावली मैत्री

बिपाशाने निभावली मैत्री

googlenewsNext
मैत्री निभावण्यात बिपाशा बासू कधीही मागे राहत नाही. सध्या ती तिचा फॅशन डिझायनर मित्र विक्रम फडणवीसची प्रशंसा करताना थकत नाही. विक्रम लवकरच दिग्दर्शक क्षेत्रत पदार्पण करीत आहे. या चित्रपटाची कथा त्याने स्वत: लिहिली आहे. विक्रमच्या निया या चित्रपटात बिपाशा मुख्य भूमिकेत दिसणार असून तिच्यासोबत राणा डग्गूबत्तीही महत्त्वाच्या भूमिकेत असेल. विक्रमची प्रशंसा करताना बिपाशा म्हणाली की, ‘विक्रमने एक उत्कृष्ट कथा लिहिली आहे. गेल्या 14 वर्षात मी अशी कथा कधीही ऐकली नाही. या चित्रपटात काम करणो ही माङयासाठी गर्वाची गोष्ट आहे. या चित्रपटात मी समायराची भूमिका निभावणार आहे. आजवर मी निभावलेल्या उत्कृष्ट भूमिकांपैकी ही एक भूमिका असेल. चित्रपटाची कथा सर्वानाच आवडेल, असा मला विश्वास आहे.’ बिपाशाचा ‘क्रिएचर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला; पण नंबर गेमने फरक पडत नसल्याचे ती म्हणते.

 

Web Title: Bipashane Dostling Friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.