अशी रंगली आराध्याच्या वाढदिवसाची ग्रॅण्ड पार्टी, मुलांसह पोहोचले बॉलिवूड सेलिब्रिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 10:50 AM2019-11-17T10:50:12+5:302019-11-17T10:56:38+5:30

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिचा वाढदिवस थाटात साजरा झाला.

on the birthday of aaradhya bachchan mom aishwarya rai organized the grand party bollywood celebs reached with kids | अशी रंगली आराध्याच्या वाढदिवसाची ग्रॅण्ड पार्टी, मुलांसह पोहोचले बॉलिवूड सेलिब्रिटी

अशी रंगली आराध्याच्या वाढदिवसाची ग्रॅण्ड पार्टी, मुलांसह पोहोचले बॉलिवूड सेलिब्रिटी

googlenewsNext
ठळक मुद्दे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नानंतर 4 वर्षांनी आराध्याचा जन्म झाला होता.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिचा वाढदिवस थाटात साजरा झाला. काल आराध्याच्या वाढदिवसानिमित्त ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन करण्यात आलेत. आराध्याची मॉम ऐश्वर्या राय बच्चन हिने ही पार्टी होस्ट केली. आराध्या ही बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध स्टार किड आहे. आराध्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच व्हायरल होऊ लागतात. बच्चन कुटुंबाची नात म्हणूनही आराध्याचे विशेष महत्व आहे. ऐश्वर्या  आराध्याची प्रचंड काळजी घेते. ऐश्वर्या जिथे जाईल तिथे आराध्या तिच्यासोबत असते.  

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या मुलांसह या पार्टीमध्ये सामील झाले होते. सध्या या पार्टीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

शाहरुख खान आणि गौरी खान आपला मुलगा अबराम खानसमवेत पार्टीत पोहोचले.

याशिवाय करण जोहर ही आपल्या दोन मुलांसह आला होता. रुही आणि यश असे करणच्या मुलांची नावे आहेत.


रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनीही आपल्या दोन मुलांसह या पार्टीला हजेरी लावली.

नताशा पूनावाला हिनेही आपली मुले आणि पतीसह हजेरी लावली.


 ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नानंतर 4 वर्षांनी म्हणजेच 16 नोव्हेंबर 2011 साली आराध्याचा जन्म झाला होता. आराध्या ही कुटुंबातील सर्वांची लाडकी असून, याआधी अनेकदा ऐश्वयार्सोबत तिला आपण अनके शोज मध्ये पाहिले आहे.

Web Title: on the birthday of aaradhya bachchan mom aishwarya rai organized the grand party bollywood celebs reached with kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.