Birthday special : झक्कास! फिल्मी आहे अनिल कपूरची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 08:00 AM2019-12-24T08:00:00+5:302019-12-24T08:00:06+5:30

अभिनेता अनिल कपूरचा आज वाढदिवस.

Birthday special : Anil Kapoor's love story with sunita | Birthday special : झक्कास! फिल्मी आहे अनिल कपूरची लव्हस्टोरी

Birthday special : झक्कास! फिल्मी आहे अनिल कपूरची लव्हस्टोरी

googlenewsNext

अभिनेता अनिल कपूरचा आज वाढदिवस. अनिलने साठी ओलांडलीय. पण आजही त्याला पाहताच ‘झक्कास’ हा एकच शब्द आठवतो. आज अनिलचा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही त्याची लव्हस्टोरी तुम्हाला सांगणार आहोत.
 अनिल कपूर व सुनीता यांनी लग्नाआधी 10 वर्षे एकमेकांना डेट केले आणि एकदिवस अचानक लग्न केले. होय, आपण उद्या लग्न करतोय, असे अनिलने सुनीताला सांगितले आणि दुस-याच दिवशी केवळ 10 लोकांच्या साक्षीने लग्न उरकले. एका मुलाखतीत अनिलने त्याच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते.

अशी सुरु झाली लव्हस्टोरी...
अनिलने सांगितले होते की, माझ्या एका मित्राने सुनीताला माझा नंबर दिला होता. जेणेकरून ती मला प्रँक कॉल करू शकेल. एकदा आम्ही बोललो आणि तिचा आवाज ऐकून मी तिच्यावर भाळलो. काही आठवड्यानंतर आम्ही एका पार्टीत भेटलो. ती आमची पहिली भेट होती. पण सुनीतामध्ये असे काही होते की, मी तिच्याकडे आकर्षित झालो. आम्ही मित्र बनलो. त्यावेळी माझे ब्रेकअप झाले होते, ही गोष्टही मी तिच्याशी शेअर केली होती. यानंतर आम्ही कधी एकमेकांना डेट करू लागलो, हेच कळले नाही. आमच्यात बायॅफ्रेन्ड - गर्लफ्रेन्डसारखे काहीही नव्हते. पण प्रेम होते.

जस्ट कम ना...
ती स्वतंत्र कुटुंबातील होती. तिचे पापा बँकर होते. ती स्वत: मॉडेलिंग करत होती आणि मी बेकार होतो. मी चेंबूरला राहायचो आणि ती नेपियनसी रोडवर. मी तिला भेटायला बसने जायचो. पण ती मला टॅक्सी घ्यायला सांगायची. माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितल्यावर, जस्ट कम ना... आय विल मॅनेज... हे तिचे उत्तर ठरलेले असायचे...

मी किचनमध्ये जाणार नाही...
लग्नानंतर मी किचनमध्ये जाणार नाही आणि जेवण बनवणार नाही, हे लग्नाआधीच सुनीताने स्पष्ट केले होते. त्यामुळे हिच्यासोबत लग्न करायचे तर मला काहीतरी बनावे लागेल, हे मला समजून चुकले होते. मी त्याकाळात प्रचंड स्ट्रगल केले. अर्थात सुनीताकडून माझ्यावर कधीच कुठला दबाव नव्हता...

अन् दुस-यादिवशी लग्न
‘मेरी जंग’नंतर आता मी सुनीतासोबत लग्न करू शकतो, असे मला वाटले. आता मी घर घेऊ शकत होतो, नोकर ठेऊ शकत होतो. मी सुनीताला फोन केला आणि उद्या आपण लग्न करतोय, असे तिलासांगितले. दुसºयाच दिवशी केवळ 10 लोकांच्या साक्षीने आम्ही लग्न केले. लग्नानंतर तीन दिवसांनी मी शूटवर निघून गेलो आणि सुनीता एकटी हनीमूनसाठी गेली. ती मला खूप चांगल्याप्रकारे ओळखते. ती एक परफेक्ट आईच नाही तर परफेक्ट पत्नी सुद्धा आहे.

Web Title: Birthday special : Anil Kapoor's love story with sunita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.