Birthday Special : श्रीदेवींच्या जवळ राहण्यासाठी बोनी कपूर यांनी दिली होती दुप्पट फी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 10:23 AM2018-11-11T10:23:56+5:302018-11-11T10:24:29+5:30
मिस्टर इंडिया, नो एंट्री, जुदाई, रूप की राणी चोरों का राजा यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणारे बोनी कपूर यांचा आज (११ नोव्हेंबर) वाढदिवस. पत्नी श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर बोनी कपूर यांचा हा पहिला वाढदिवस आहे.
मिस्टर इंडिया, नो एंट्री, जुदाई, रूप की राणी चोरों का राजा यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणारे बोनी कपूर यांचा आज (११ नोव्हेंबर) वाढदिवस. पत्नी श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर बोनी कपूर यांचा हा पहिला वाढदिवस आहे. आजही श्रीदेवींच्या आठवणीने बोनी कपूर यांचे डोळे पाणावतात. श्रीदेवींच्या मृत्यूनंतर त्यांनी हे अनेकदा बोलून दाखवले आहे.
श्रीदेवी व बोनी कपूर दोघेही २ जून १९९६ रोजी लग्नबंधनात अडकले होते. यानंतरच्या २२ वर्षांच्या संसारात अनेक चढऊतार आलेत. पण श्रीदेवी व बोनी यांचे नाते अभंग राहिले. मात्र यावर्षी २४ फेब्रुवारीला हे नाते भंगले. श्रीदेवींनी जगाचा निरोप घेतला. श्रीदेवींच्या निधनानंतर बोनी कपूर आई-वडिल दोघांचेही कर्तव्य बजावत आहेत. खुशी आणि जान्हवी या दोघींना आईच्या मायेने सांभाळत आहेत.
बोनी कपूर यांचा जन्म एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील सुरिंदर कपूर सुद्धा एक चित्रपट दिग्दर्शक होते. बोनी कपूर, अनिल कपूर आणि संजय कपूर हे तिघे भाऊ आहेत. बोनी यांना पहिली पत्नी मोनापासून अर्जुन आणि अंशुला असे २ मुले आहेत.
१९८० मध्ये बोनी कपूर यांचा ‘हम पांच’ नावाचा पहिला चित्रपट आला. आपल्या करिअरमध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिलेत. मोना शौरीसोबत त्यांचे पहिले लग्न झाले होते. अर्जुन कपूर आणि अंशुलाच्या जन्मानंतर बोनी यांनी मोनापाासून घटस्फोट घेत श्रीदेवींशी लग्न केले. श्रीदेवी लग्नाच्या आधी प्रेग्नेंट होत्या. त्यामुळे अतिशय घाईघाईत हे लग्न उरकण्यात आले.
बोनी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या लव्हस्टोरीमधला एक इंटरेस्टिंग किस्सा सांगणार आहोत. असे म्हणतात की, सुरुवातीला श्रीदेवी बोनींना जराही भाव द्यायच्या नाहीत. तेव्हा बोनी आपल्या लहान भावाला घेऊन ‘मिस्टर इंडिया’ चित्रपट तयार करत होते. या चित्रपटात बोनी यांनी श्रीदेवींना कास्ट करण्याचा निर्णय घेतला. श्रीदेवींच्या जवळ राहण्यासाठी बोनी कपूर कुठल्याही दिव्यातून जायला तयार होते. याचमुळे ‘मिस्टर इंडिया’ मध्ये त्यांना श्रीदेवीच हव्या होत्या. त्यांनी श्रीदेवींच्या आईशी संपर्क साधला. पण श्रीदेवींच्या आईने दुप्पट मानधनाची मागणी केली. बोनी कपूर श्रीदेवीच्या प्रेमात इतके गढून गेले होते की, त्यांनी ही मागणी मान्य केली. त्यावेळी बोनी कपूर विवाहित नव्हते. याचदरम्यान त्यांनी मोनासोबत लग्न केले. पण लग्नानंतरही बोनी कपूर यांच्या मनात श्रीदेवीच होत्या. श्रीदेवींच्या जवळ राहण्याचे अनेक बहाणे ते शोधत असत.
एक वेळ अशी आली की, श्रीदेवींची आई आजारी पडली आणि तिला उपचारासाठी अमेरिकेला न्यावे लागले. हा संपूर्ण खर्च बोनी यांनी उचलला. बोनीच्या या स्वभावामुळे श्रीदेवी त्याच्या जवळ आल्या. पण याच काळात श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगात होत्या.
१९८४ मध्ये ‘जाग उठा इन्सान’च्या शूटींगदरम्यान श्रीदेवी व मिथुन यांचे प्रेम बहरले होते. मिथुन दा यांना श्रीदेवीशी लग्न करायचे होते. मात्र त्यासाठी मिथुन यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यावा, अशी श्रीदेवीची अट होती. तर श्रीदेवी आपल्याला धोका देते आहे असे मिथुन यांना वाटत होते. या कारणामुळे मिथुन यांनी श्रीदेवीला बोनी कपूरला राखी बांधायला लावली होती. मात्र ज्याला राखी बांधली, त्याच व्यक्तिशी श्रीदेवींनी नंतर विवाह केला.