Birthday Special: हृतिक रोशनचा फिटनेस फंडा, सोशल मीडियावरील त्याचे हे फोटो तुम्हालाही देतील प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 02:47 PM2019-01-10T14:47:28+5:302019-01-10T14:51:14+5:30

हृतिक सध्या आनंद कुमारवर तयार होत असलेल्या सुपर 30 बायोपिकमध्ये व्यस्त आहे.

Birthday Special: Hrithik Roshan's fitness funda, his photos on social media will give you inspiration | Birthday Special: हृतिक रोशनचा फिटनेस फंडा, सोशल मीडियावरील त्याचे हे फोटो तुम्हालाही देतील प्रेरणा

Birthday Special: हृतिक रोशनचा फिटनेस फंडा, सोशल मीडियावरील त्याचे हे फोटो तुम्हालाही देतील प्रेरणा

googlenewsNext

कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात. हृतिक सध्या आनंद कुमारवर तयार होत असलेल्या सुपर 30 बायोपिकमध्ये व्यस्त आहे. हृतिकचा एक फोटो समोर आला आहे. या सिनेमातल्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी हृतिक प्रचंड मेहनत घेत आहे. फिटनेसबाबत सजग असलेला हृतिक जिममध्ये घाम गाळत असल्याचे या फोटोत पाहायला मिळत आहे. त्याची  पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. हृतिकची पिळदार बॉडी पाहून त्याच्या या फोटोला त्याच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा हा फोटो तुम्हालाही जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देईल. यापूर्वीही 'क्रिश' सिनेमासाठी हृतिकने वजन कमी केले होते.

कितीही बिझी असला तरी हृतिक आपल्या वर्कआऊटकडे दुर्लक्ष करत नाही. त्याने वर्कआऊटच्या काही सवयी स्वतःला लावून घेतल्या आहे. त्यांचे तो नित्यनियमाने आणि काटेकोरपणे पालन करतो. आठवड्यातून चार वेळा नियमितपणे तो व्यायाम करतो तर तीन दिवस आराम करतो.

दररोज हृतिक जवळपास अर्धा तास कार्डिओ एक्सरसाईज करतो.  तो फिटनेसचा आंतरराष्ट्रीय ट्रेंड आणि वर्कआउट रुटीन फॉलो करतो. यामध्ये तो कार्डियो, स्ट्रेचिंग, पावर वर्कआउट करतो. त्याची फिटनेसबाबत असलेली ही सजगता आणि नियमित वर्कआऊट करणे यामुळे हृतिक फिट आणि आरोग्यदायी आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. त्यामुळेच की फिटनेसबाबत तो आज लाखो तरुणांचा आदर्श आहे. 

Web Title: Birthday Special: Hrithik Roshan's fitness funda, his photos on social media will give you inspiration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.