Birthday Special : 24 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत लिपलॉक सीन देऊन रम्या कृष्णन यांनी उडवली होती खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 08:00 AM2019-09-15T08:00:00+5:302019-09-15T08:00:02+5:30
‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’या चित्रपटांत शिवगामी देवीची लक्षवेधी भूमिका साकारणा-या अभिनेत्री रम्या कृष्णन यांचा वाढदिवस.
‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’या चित्रपटांत शिवगामी देवीची लक्षवेधी भूमिका साकारणा-या अभिनेत्री रम्या कृष्णन यांचा वाढदिवस. १५ सप्टेंबर १९७० रोजी चेन्नई येथे त्यांचा जन्म झाला झाला. उण्यापु-या १३ वर्षांच्या असताना त्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली. हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये २०० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. पण ‘बाहुबली’ने त्यांना जी ओळख दिली, ती अन्य कुठल्याही चित्रपटाने नाही.
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस रम्या कृष्णन यांनी दक्षिणात्य चित्रपटात काम केले. दाक्षिणात्य चित्रपटामध्ये लोकप्रियता मिळविल्यानंतर रम्या यांना बॉलिवूड खुणावू लागले. 1988 मध्ये त्यांना पहिला हिंदी चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे नाव होते, ‘दयावान’. माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यात लीड रोलमध्ये होते. हा चित्रपट सुपरहिट झाला. पण रम्या यांना या चित्रपटाचा फार लाभ झाला नाही. कारण त्या यात डान्सरच्या भूमिकेत होत्या.
बॉलिवूडमध्ये रम्या यांना खास यश मिळाले नाही. पण बोल्ड अंदाजामुळे त्या कायम चर्चेत राहिल्या. ‘परंपरा’ या चित्रपटात स्वत:पेक्षा 24 वर्षे मोठ्या विनोद खन्ना यांच्यासोबत लिपलॉक सीन करून त्यांनी खळबळ निर्माण केली होती.
‘परंपरा’नंतर सुमारे चार-पाच वर्षे रम्या यांना कुठलाही बॉलिवूड सिनेमा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा साऊथकडे मोर्चा वळवला.
१२ जून २००३ मध्ये तेलगु दिग्दर्शक कृष्णा वामसी यांच्याशी त्यांनी विवाह केला.
२०१५ मध्ये आलेला बाहुबली चित्रपट हा त्यांच्या कारकिदीर्तील मैलाचा दगड ठरला. यातील शिवगामीच्या भूमिकेला भारतातच नाही तर परदेशातही लोकप्रियता मिळाली . या चित्रपटामध्ये त्यांनी केलेल्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले असून आजही त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.