Birthday Special : टायगर श्रॉफला पाळण्यातच मिळाले होते साईनिंग अमाऊंट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 08:00 AM2020-03-02T08:00:00+5:302020-03-02T08:00:01+5:30

हॅपी बर्थ डे टायगर...

birthday special lesser known facts about actor tiger shroff-ram | Birthday Special : टायगर श्रॉफला पाळण्यातच मिळाले होते साईनिंग अमाऊंट!!

Birthday Special : टायगर श्रॉफला पाळण्यातच मिळाले होते साईनिंग अमाऊंट!!

googlenewsNext
ठळक मुद्दे टायगरचे टायगर हे नाव पडण्यामागे त्याची लहानपणीची एक सवय कारणीभूत आहे.

‘हिरोपंती’ या चित्रपटातून डेब्यू करणारा टायगर श्रॉफ आता बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. लाखों तरूणी त्याच्यावर फिदा आहेत. आज टायगरचा वाढदिवस. 2 मार्च 1990 रोजी जन्मलेल्या टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे. आज टायगरबद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 डॅड जॅकी श्रॉफ यांच्या पावलावर पाऊल टाकत टायगर बॉलिवूडमध्ये आला. पण खरे तर टायगरचा जन्म झाला, त्याचक्षणी तो हिरो बनणार, हे निश्चित झाले होते. अगदी पाळण्यात असतानाच त्याला साईनिंग अमाऊंटही मिळाले होते.  होय, जॅकी श्रॉफ यांच्या घरी मुलगा झाला हे कळताच दिग्दर्शक सुभाष घई जॅकी यांच्या घरी गेलेत. टायगर पाळण्यात होता. त्याला पाहून सुभाष घईनी खिशातून 101 रूपये काढलेत आणि ते जॅकीच्या हातावर ठेवले. हे 101 रूपये म्हणजे टायगरचे साईनिंग अमाऊंट होते.

हा मोठा झाला की, मी त्याला हिरो म्हणून लॉन्च करणार, असे 101 रूपये देत सुभाष घई जॅकीला सांगितले होते. अर्थात टायगर मोठा झाल्यावर असे काहीही झाले नाही. होय, कारण टायगरला सुभाष घई यांनी नाही तर साजिद नाडियाडवाला यांनी ‘हिरोपंती’मधून लॉन्च केले.


असे पडले टायगर नाव

 टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे. टायगरचे वडिल जॅकी यांचा लहान भाऊ जय हेमंत याच्या नावावरून त्याचे नाव ठेवण्यात आले होते. जॅकी श्रॉफ यांनी खूप लहान वयात या भावाला गमवले होते. पण मग जय हेमंतचे टायगर हे नाव कसे पडले?  
 टायगरचे टायगर हे नाव पडण्यामागे त्याची लहानपणीची एक सवय कारणीभूत आहे. होय, लहानपणी टायगरला चावायची सवय होती. तो सगळ्यांना चावत सुटायचा.  तो सतत चावायचा. या सवयीसाठी त्याच्या आईने त्याला अनेकदा बदडले होते. तो जसा जसा मोठा झाला, तशी तशी त्याची ही सवय वाढली. घरी येणा-या पाहुण्यांनाही तो चावायचा. त्यामुळे जॅकी यांनी त्याचे टायगर हे नाव ठेवले होते.

टायगर व कृष्णा (टायगरची लहान बहीण) खूप खेळायचे. तितकेच भांडायचे. एकदा दोघांमध्ये इतके जोरदार भांडण झाले की, टायगरने कृष्णाला चावा घेतला. हा चावा इतका जोरदार होता की  तिला डॉक्टरकडे न्यावे लागले. यामुळे टायगरची आई इतकी संतापली की, तिने त्याला मिरची चाटवली. पुढे पुढे तो जेव्हाही चावायचा ती त्याला मिरची चाटवायची. मग मात्र टायगर घाबरू लागला आणि हळूहळू त्याची ती सवय मोडली. पण त्याचे टायगर हे नाव मात्र कायम राहिले.

Web Title: birthday special lesser known facts about actor tiger shroff-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.